वृत्तसंस्था
मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे पोलीस बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे हे त्यांच्या उत्पन्नामुळे चर्चेत आले आहेत. अनेक माध्यमांतील वृत्तानुसार, त्यांचा वार्षिक पगार 1.5 कोटी रुपये आहे. या बातम्यानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे यांची डीबी मार्ग पोलिसांत तडकाफडकी बदली केली आहे. राज्य सेवा अधिनियमानुसार पोलिसांना दुसऱ्या ठिकाणचे वेतन स्वीकारण्याचा अधिकार नाही, असे झाले असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, असे स्पष्टीकरणही आयुक्तांनी दिले आहे. Amitabh Bachchan Bodyguard Jitendra Shinde Whopping Salary Will Surprise You Now Transferred By CP
याप्रकरणी जितेंद्र शिंदेंविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे हे मुंबई पोलीस खात्याशी संलग्न होते, ते आतापर्यंत अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड होते. मागच्या काही वर्षांपासून ते हे काम करत होते. नुकतेच असे अनेक मीडिया रिपोर्ट आले होते की ज्यात त्यांची वार्षिक कमाई 1.5 कोटी असल्याचे सांगण्यात आले. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शिंदे यांच्या कमाईचे स्रोत काय आहेत, याचा तपास केला जात आहे.
टीओआयनुसार, शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, ते एक सुरक्षा एजन्सीदेखील चालवतात. सूत्रांचे म्हणणे आहे की, सुरक्षा एजन्सींच्या माध्यमातून ते अनेक सेलेब्सना सुरक्षाही देतात. शिंदे यांनी सांगितले की, त्यांची पत्नी सुरक्षा एजन्सी चालवते आणि हा व्यवसाय तिच्या नावावर आहे. मुंबई पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
अमिताभ बच्चन त्यांना दीड कोटी देतात, या दाव्याचे शिंदे यांनी खंडन केले आहे. मुंबई पोलिसांच्या मते, कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याचे पोस्टिंग एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. जितेंद्र अमिताभ बच्चन यांच्यासोबत 2015 पासून काम करत आहे. अमिताभ यांना सरकारकडून एक्स श्रेणी सुरक्षा मिळाली आहे. त्यात नेहमी दोन कॉन्स्टेबल तैनात असतात. शिंदे यांना अमिताभ यांच्यासोबत अनेक प्रसंगी बॉडीगार्ड म्हणून पाहण्यात आले आहे.
Amitabh Bachchan Bodyguard Jitendra Shinde Whopping Salary Will Surprise You Now Transferred By CP
महत्त्वाच्या बातम्या
- युनिटेकच्या मालकांना तिहारमधून मुंबईतील तुरुंगात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांच्या खुर्चीला लागणार सुरुंग, काँग्रेसच्या सर्व आमदारांना दिल्लीत बोलावले
- योदी आदित्यनाथ सरकारने जाहीर केल्या शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती, विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु
- जालियनवाला बागचा नवीन परिसर २८ ऑगस्ट रोजी राष्ट्राला समर्पित केला जाईल, पंतप्रधान मोदी उद्घाटन करतील