प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने चंग बांधला आहे. भाजपचे राज्य पातळीवरील नेतृत्व त्यासाठी कामाला लागले असतानाच आता केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौरा करणार आहेत. त्यामुळे यावेळी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मेगाप्लॅन आखला जाऊ शकतो अशी चर्चा होत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. Amit shah to hold political impactful meetings in Mumbai regarding municipal elections
राजकीय बैठक होणार
अमित शहा हे मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. पण आम्ही त्यांना विनंती केली आहे की, त्यांच्या सहवासाचा लाभ आम्हाला देखील मिळायला हवा. त्यामुळे त्यांच्यासोबतच निश्चितच राजकीय बैठक होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही सर्वात महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका तिकीट वाटपात स्वतः अमित शहा हे लक्ष घालणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
हिंदू सणांवरील विघ्न दूर
भाजपकडून मुंबईत ठिकठिकाणी, आमचं सरकार आलं आणि हिंदू सणांवरचं विघ्न दूर झालं, अशी बॅनरबाजी करण्यात येत आहे. त्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. हे बॅनर्स हे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वतीने लावण्यात आले आहेत. त्यामुळे याबद्दल ते आपल्याला सांगू शकतील. पण निश्चितच हिंदू सणांवरील विघ्न दूर झाल्यामुळे लोकांमध्ये आनंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिका आम्हीच जिंकणार
भाजपने केवळ वरळी नाही तर मुंबईवर लक्ष्य केंद्रित केले आहे. भाजपला मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप मिळून ही निवडणूक नक्कीच जिंकू, असा ठाम विश्वास असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
Amit shah to hold political impactful meetings in Mumbai regarding municipal elections
महत्वाच्या बातम्या
- LPG Cylinder Price : LPG सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या काय आहेत दिल्ली ते मुंबईचे नवे दर?
- Rule Change From 1st September : आजपासून होणार हे 6 मोठे बदल, जाणून घ्या कसा वाढला तुमच्या खिशावरचा भार!
- Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत 117 नेते सहभागी होणार, कन्हैया कुमार आणि पवन खेरा यांचेही नाव यादीत
- अमरावतीत लव्ह जिहाद; धर्मांध मुसलमानाने फसवले उच्चविद्याविभूषित हिंदू तरुणीला!!