• Download App
    अमर,अकबर,अँथनी यांची तीन दिशेला तीन तोंड, एकमेंकांच्या पायात पाय घालून पडणारे सरकार, रावसाहेब दानवे यांची टीका|Amar, Akbar, Anthony's three faces in three directions,criticism of Raosaheb Danve

    अमर,अकबर,अँथनी यांची तीन दिशेला तीन तोंड, एकमेंकांच्या पायात पाय घालून पडणारे सरकार, रावसाहेब दानवे यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : हे तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारं सरकार आहे. अमर,अकबर,अँथनी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाही, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.Amar, Akbar, Anthony’s three faces in three directions,criticism of Raosaheb Danve

    दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथनी अशी उपमा दिली आहे. ते म्हणाले, सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर माणसांना पूर्ण वेळ बसावंच लागतं. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू,



    बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगताना दानवे म्हणाले, मला उद्धवजींनी ८ दिवसांपूर्वी फोन केला. माझे दोनदा बोलणे झाले आहे. मी त्यांना भेटायला जाणार आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी त्यांना भेटणार आहे. कदाचित या प्रकल्पासाठी त्यांची मनस्थिती झाली असावी. पण बोलल्यानंतर मला कळेल. आमचं भेटायचं ठरलं आहे.

    Amar, Akbar, Anthony’s three faces in three directions,criticism of Raosaheb Danve

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!

    सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये; राज आणि उद्धव हजर, पण पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र गैरहजर, बैठकीचे महत्त्व राहिलेच काय??

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण