• Download App
    किरीट सोमय्या प्रकरणाला हवा देण्याचा डाव, राज्यसभेत शिवसेनेचा स्थगन प्रस्ताव फेटाळला|Allegation on Kirit Somaiya, in the Rajya Sabha Shiv Sena's adjournment motion was rejected

    किरीट सोमय्या प्रकरणाला हवा देण्याचा डाव, राज्यसभेत शिवसेनेचा स्थगन प्रस्ताव फेटाळला

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिवसेनेच्या नेत्यांचे आर्थिक गैरव्यवहार बाहेर काढत असल्याने आता शिवसेनेने किरीट सोमय्या यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आयएनएस विक्रांत बचाव मोहीमेवरून सोमय्या यांच्यावर आरोप होत आहे. या प्रकरणाला राष्ट्रीय पातळीवर हवा देण्याचा शिवसेनेचा डाव मात्र हाणून पाडण्यात आला. राज्यसभेत शिवसेनेने दाखल केलेला स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आला.Allegation on Kirit Somaiya, in the Rajya Sabha Shiv Sena’s adjournment motion was rejected

    आयएनएस विक्रांतला बचाव मोहिमतून जमा झालेल्या लोकांच्या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करून यावर चर्चा व्हावी, यासाठी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुवेर्दी यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव दिला होता. राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला.



    आयएनएस विक्रांत बचाव मोहिमतून भाजपचे नेते किरीट सोमय्या व त्यांचे चिरंजीव नील किरीट सोमय्या यांनी लोकांकडून निधी जमा केला. या जनतेच्या निधीचा गैरवापर झाला असून, सभागृहाचे इतर कामकाज स्थगित करून यावर चर्चा करावी, अशी मागणी खासदार चतुवेर्दी यांनी केली होती.

    आयएनएस विक्रांत’ जहाज वाचविण्यासाठी २०१३-१४ किंवा २०१४-१५मध्ये राजभवनाच्या नावावर गोळा करण्यात आलेले पैसे राज्यपालांकडे जमा करण्यात आले काय, अशी विचारणा माहितीच्या अधिकाराखाली धीरेंद्र उपाध्ये यांनी केली होती. त्यावर अशी कोणतीही रक्कम जमा करण्यात आली नसल्याचे राज्यपालांच्या कार्यालयाने त्यांना लेखी उत्तरात दिल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

    राऊत यांचा आरोप आहे की, किरीट सोमय्या यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेची आणि राष्ट्रीय भावनेची शुद्ध फसवणूक केली. हा देशद्रोह आहे, असा भाजपचा झेंडा घेऊन देशद्रोही सोमय्यांनी ५७ कोटी रुपये गोळा केले. हा आकडा शंभर कोटींच्या वर असेल. ही रक्कम राजभवनात जमा झालेली नसेल, तर ती कुठे गेली? ती कोणाच्या घशात आणि खिशात गेली? ही रक्कम त्या काळात भाजपने निवडणुकीत वापरली की सोमय्यांच्या निकॉन इन्फ्रामध्ये वापरण्यात आली, असे सवाल राऊत यांनी केले.

    Allegation on Kirit Somaiya, in the Rajya Sabha Shiv Sena’s adjournment motion was rejected

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक