प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारायचा कार्यक्रम सुरू असताना तोच राजकीय मुहूर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आपल्या शिवसैनिक फायर आजीची भेट घेतली.All the beat for the Mumbai Municipality
नवनीत राणा रवी राणा विरुद्ध ठाकरे परिवार अशी हनुमान चालीसाची लढाई रंगलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले. मात्र, त्यांच्या स्वागताला जाण्याचे टाळून मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवसैनिक आजीची भेट घेणे पहिले पसंत केले. मुंबई पालिकेसाठी लागली सगळी “बेट” भेट, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतली फायर आजीची भेट…!! हीच वस्तुस्थिती मुंबईकरांसमोर आली.
राणा दाम्पत्य विरुद्ध मातोश्री संघर्षात 80 वर्षाच्या चंद्रभागा शिंदे या जुन्या शिवसैनिक मातोश्री भोवती पहारा द्यायला हजर होत्या. मुख्यमंत्र्यांनी मातोश्री परिसरात त्यांची भेट घेतली. त्यांची विचारपूसही केली. पण आज अचानक ते रश्मी ठाकरे आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यासह शिवडी मधल्या त्यांच्या घरी गेले. त्यांची आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आंब्याची पेटी भेट दिली. त्यामुळे मुंबईतल्या सर्व मीडियाचा फोकस केवळ पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर न राहता मुख्यमंत्र्यांच्या फायर आजी भेटीवर देखील राहिला. मुख्यमंत्र्यांनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचा कार्यक्रम टाळला असला तरी फायर आजीची भेट घेत आपल्यावरचा लाईम लाईट कायम ठेवला.