• Download App
    राज ठाकरेंवर सर्वपक्षीय नेत्यांचे शरसंधान; पण आपापले "कोपरे" धरून...!! All party leaders support Raj Thackeray; But holding their own "corners"

    Raj Thackeray : राज ठाकरेंवर सर्वपक्षीय नेत्यांचे शरसंधान; पण आपापले “कोपरे” धरून…!!

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या सभेनंतर त्यांच्यावर नेहमीप्रमाणे सर्वपक्षीय शरसंधान सुरू झाले आहे, पण ते देखील आपापले कोपरे धरूनच…!! ही वेगळी गोष्ट यातून दिसून येत आहे. All party leaders support Raj Thackeray; But holding their own “corners”

    मशिदींवरचे भोंगे या विषयावर फक्त शिवसेना नेत्यांनी आणि एमआयएमच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिलीप वळसे पाटलांनी गृहमंत्री म्हणून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र राज ठाकरे यांच्या भाषणातील फक्त एक संदर्भ लक्षात घेऊन शरसंधान केले आहे.

    संजय राऊत यांनी मशिदींवरचे भोंगे काढणार की नाही याविषयी संदिग्धता ठेवून प्रतिक्रिया व्यक्त करताना हा लेचापेचा महाराष्ट्र नाही, एवढाच इशारा राज ठाकरेंना दिला आहे. किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संयम राखायला सांगितले आहे म्हणून… नाहीतर आम्ही कमी नाही हे हे त्यांना दाखवून दिले असते, असे म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या सामाजिक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेले नाही.

    संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी फक्त भोंगे या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिम समाजाने राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करू नये. जीभ आम्हालाही आहे. कडक भाषेत आम्हीही बोलू शकतो. पण आम्ही बोलणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

    पण जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी शरद पवार जातिवादी नसल्याचे सांगत राज ठाकरे यांच्या भाषणातला लोकमान्य टिळकांचा मुद्दा उचलला आहे. लोकमान्य टिळकांनी रायगडावराची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधलेली नाही, असे एकापाठोपाठ एक दावे करणारे पुरावे जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांनी मांडले आहेत.

    याचाच अर्थ प्रत्येक नेत्याने आपापले “कोपरे” धरत राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. राज ठाकरे यांच्या भाषणातील मूळ मुद्द्यावर बोलायला तयार नाही. 4 तारखेला काढणार की नाही??, हे कोणी सांगायला तयार नाही. पण आम्ही बघून घेऊ, तुम्ही कोण? राज ठाकरे यांची शरद पवारांच्या तुलनेत राजकीय लायकी वगैरे भाषा वापरून त्यांच्या भाषणात या मूळ मुद्द्यांना मात्र सगळ्याच पक्षांचे नेते बगल देत आहेत.

    All party leaders support Raj Thackeray; But holding their own “corners”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !