राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध एक एप्रिलपासून हटणार आहेत पण मास्क कायम राहणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.All Corona restrictions will be lifted from April 1, but the mask will remain
विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध एक एप्रिलपासून हटणार आहेत पण मास्क कायम राहणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
डॉ. टोपे म्हणाले की, “राज्यात 1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध मुक्ती होणार आहे. कोरोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर आलेले निर्बंध देखील हटणार आहेत. या काळात मात्र, लोकांनी मास्कचा नियमित वापर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
परदेशामध्ये कोरोनाचा धोका वाढतो आहे. त्यामुळे आगामी सणवार साजरे करताना काळजी घ्या. दुसऱ्या देशांमधील चौथ्या लाटेचा परिणाम आपण पाहतो आहोत. त्यामुळे मास्क मुक्तीचं धाडस शक्य नाही. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरलाच गेला पाहिजे. तेच आपल्यासाठी हितकारक आहे. तुर्तास तरी संपूर्णपणे मास्क मुक्तीचा कसलाही विचार सरकारने केलेला नाहीये. त्यामुळे मास्क हा घातलाच पाहिजे.
चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात चिंता व्यक्त होत असताना भारतात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रात कोरोना निर्बंधातून मुक्तता मिळणार आहे.
All Corona restrictions will be lifted from April 1, but the mask will remain
महत्त्वाच्या बातम्या
- कार्यपध्दतीच संशयास्पद असल्याने जागतिक विषमता अहवाल सदोष, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट
- पत्रकार राणा अयूबला लंडनला जाताना मुंबई विमानतळावरच रोखले, कोरोनाच्या नावाखाली
- ओएनजीसी लिमिटेड मधील 1.5% शेअर्स विकून सरकार उभारणार 3 हजार कोटी रुपये
- काश्मीर फाइल्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सहारणपूरमधील मौलानांची पत्रकार परिषद, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की