कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.Alarm bells in the city! Lockdown orders in 61 villages in the district till October 13
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचं चित्र आहे. परंतु तिसऱ्या लाटेचं संकटही अजून कायम आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये १३ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेत.मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. विशेष म्हणजे अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढलेत
४ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ६१ गावांमधील संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. ज्या भागात जास्त रुग्ण आहेत, असे भाग कन्टेनमेंट झोन करणार. गावात कोणालाही येण्यास व जाण्यास प्रतिबंध.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, वस्तू, विक्री, सेवा बंद.पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यासही मनाई. कृषी माल वगळता इतर वाहनांना गावात बंदी.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक २४ गावांचा यात समावेश आहे. ४ ऑक्टोबरपासून १३ ऑक्टोबरपर्यत हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय.
यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल २४ , श्रीगोंदा तालुक्यातील ९, राहाता तालुक्यातील ७ तर पारनेर तालुक्यातील ६ गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आलाय.
Alarm bells in the city! Lockdown orders in 61 villages in the district till October 13
महत्त्वाच्या बातम्या
- अकाउंट सुरु करण्यासाठी न्यायाधीशांनीच ट्विटरवर दबाव आणा; अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी
- शाळेची घंटा वाजली ! आजपासून शाळा सुरू, मुख्यमंत्री साधणार ऑनलाईन संवाद
- Pandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका
- SHOCKING NEWS Pandora papers: ६०० पत्रकारांचे sting operation ! परदेशात संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार ; पँडोरा पेपर्स प्रकरणात सचिन तेंडुलकर-जॅकी श्रॉफचे नाव