Thursday, 8 May 2025
  • Download App
    औरंगजेबाच्या थडग्यात समोर वाकला; पण महाराष्ट्रातील नेत्यांच्या तोंडी वाफा!!; गुन्हा दाखल नाहीच!! Akbaruddin Owaisi came to Aurangzeb's tomb during his visit to Sambhajinagar and bowed down

    Akbaruddin Owaisi : औरंगजेबाच्या थडग्यात समोर वाकला; पण महाराष्ट्रातील नेत्यांच्या तोंडी वाफा!!; गुन्हा दाखल नाहीच!!

    प्रतिनिधी

    संभाजीनगर : एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी संभाजीनगरच्या दौऱ्यात औरंगजेबाच्या थडग्यावर येऊन वाकले. त्यावर चादर चढवली. आपल्या बरोबर खासदार इम्तियाज जलील आणि आमदार वारिस पठाण यांना घेतले. राज ठाकरे यांच्यावर विखारी भाषेत टीका केली आणि निघून गेले. त्याला 12 – 14 तास उलटून गेल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी तोंडी वाफा दवडल्या आहेत. Akbaruddin Owaisi came to Aurangzeb’s tomb during his visit to Sambhajinagar and bowed down

    ही महाराष्ट्राची माती आहे. याच मातीत मराठ्यांनी औरंगजेबाला गाडले होते. त्यांना त्याच मातीत थडग्यात जायचे आहे, अशी तोंडी वाफ शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दवडली आहे.

    मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा मानण्याचे नुसते आव्हान दिल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणाऱ्या ठाकरे – पवार सरकारने अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पण संजय राऊत यांनी नुसतीच तोंडी वाफ दवडून घेतली आहे.

    संभाजीनगर मध्ये येऊन औरंगजेबाच्या थडग्या समोर वाकायचे हे महाराष्ट्राला आणि मराठ्यांना आव्हान दिले आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारतो. ज्या औरंगजेबाला मराठ्यांनी मराठी मातीत गाडले त्याच मातीत तुम्हाला जायचे आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

    राम कदम आणि नितेश राणे या दोन आमदारांनी ठाकरे – पवार सरकारवर याच मुद्यावरून जोरदार तोंडसुख घेतले आहे. पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा. नाही त्याला औरंगजेबाकडे पाठवला तर मराठ्यांचे नाव लावणार नाही. आम्ही भाजपचे आमदार – खासदार नंतर आहोत आणि आम्ही आधी मराठे आहोत आणि छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

    तर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावणाऱ्या ठाकरे – पवार सरकार मध्ये दम असेल तर त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी वर देशद्रोहाचे कलम लावून दाखवावे, असे आव्हान राम कदम यांनी दिले आहे. अकबरुद्दीन ओवैसी महाराष्ट्रात संभाजीनगर मध्ये येऊन औरंगजेबाच्या थडग्यावर वाकून 12 – 14 तास उलटून गेल्यानंतर संजय राऊत, राम कदम, नितेश राणे या हिंदू नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

    Akbaruddin Owaisi came to Aurangzeb’s tomb during his visit to Sambhajinagar and bowed down

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी