प्रतिनिधी
मुंबई : बाकी दुसरे कशासाठी नाही, तर तुरुंगात चक्की पिसायच्या भीतीने अजितदादा गट भाजपच्या वळचणीला गेल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. Ajitdad’s group defected to BJP for fear of being jailed
विरोधी आघाडीच्या बैठकीसाठी बंगळुरूसाठी विमानतळावर निघताना मुंबईतील एका हॉटेलात राष्ट्रवादीतून भाजपात सामील झालेल्या नेत्याची भेट अचानक झाली. ते ‘एनडीए’ बैठकीसाठी दिल्लीत निघाले होते. यावेळी ‘देशात चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचे नाही, अशी भीती या नेत्याने बोलून दाखवली, असे संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा हा नेता कोण? हे मात्र संजय राऊत यांनी गुलदस्त्यात ठेवले. त्यामुळे तो नेता कोण असावा, यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या त्या नेत्याशी संजय राऊत यांचा नेमका संवाद कसा झाला? हे सामनात छापले आहे.
राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्याचा संवाद जशास तसा
संजय राऊत यांनी सांगितले की, बंगळुरूसाठी विमानतळावर निघताना मुंबईतील एका हॉटेलात राष्ट्रवादीतून भाजपात सामील झालेल्या नेत्याची भेट अचानक झाली. ते ‘एनडीए’ बैठकीसाठी दिल्लीत निघाले होते. मी सांगितले, “आम्ही बंगळुरात निघालोय.” यावर त्यांचा प्रश्न, “तेथे जाऊन आता काय साध्य होणार?”
मी सांगितले, “आम्ही बंगळुरात निघालोय.” यावर त्यांचा प्रश्न, “तेथे जाऊन आता काय साध्य होणार?”
“काय होणार? ते शेवटी जनताच ठरवेल. मोदी ज्यांना स्वत:चे वैयक्तिक शत्रू समजतात त्या सगळय़ा देशभक्त पक्षांचे ऐक्य व्हावे, त्यांचे नेते एकत्र राहावेत अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केला आहात,” असे मी म्हटले. त्यावर ते म्हणाले, “विरोधी पक्षांचे ऐक्य आता कशासाठी?”
“मोदी-शहांचा पराभव करण्यासाठी!”
“मोदीचा पराभव का करायचा?” प्रश्न.
“देशातील हुकूमशाही संपवून लोकशाही टिकविण्यासाठी. आज सत्तेचे, संपत्तीचे विकेंद्रीकरण पूर्णपणे संपले आहे. सत्ता व संपत्ती फक्त दोन-चार लोकांच्याच हाती एकवटली आहे. हे चित्र तुम्हाला पटते काय?” माझा प्रश्न.
“चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचे नाही… त्यामुळे मोदी हवेत.” असे ते म्हणाले.
“2024 ला मोदी जातील. तेव्हा काय कराल?”
“ते खरेच जातील काय?”
“जातील हे नक्की!” मी ठामपणे सांगितले.
हा पूर्ण संवाद देऊन राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Ajitdad’s group defected to BJP for fear of being jailed
महत्वाच्या बातम्या
- भाजपा लखनऊमध्ये घेणार पसमंदा परिषद, मुस्लिमांशी करणार चर्चा
- मणिपूरमध्ये आणखी 2 मुलींवर गँगरेप, दोघांचीही हत्या; जमावासोबत आलेल्या महिलांनीच रेपसाठी दिली चिथावणी
- तिहार तुरुंगातील चार अधिकारी निलंबित, यासीन मलिकच्या हजेरीबाबत निष्काळजीपणाचा आरोप
- पोस्टर्स लावून मुख्यमंत्री होता येत नाही, त्याला 145 आमदार लागतात पण…; हसन मुश्रीफांची टोलेबाजी