प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ मंत्रालयाचे सूत्रे आज हाती घेतल्यानंतर अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 आमदारांना शरदनिष्ठ राष्ट्रवादीने कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजितदादा शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक वर दाखल झाले आहेत. Ajitdada filed on Silver Oak
अर्थात या भेटीमागे काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होत असून त्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. अजितदादा या निमित्ताने शरद पवारांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
अजितनिष्ठ 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आज त्यांचे खाते वाटप करण्यात आले. यामध्ये अजितदादांकडे अर्थ आणि नियोजन, तर दिलीप कोळसे पाटील यांच्याकडे सहकार खाते तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते सोपविण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा खाते सोपविले आहे.
हे खाते वाटप होऊन या मंत्र्यांनी कारभार स्वीकारताच त्यांना शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसने आपण पक्ष का सोडला??, आपल्याला निलंबित का करण्यात येऊ नये?? आपली आमदारकी रद्द का करू नये?? अशा आशयाच्या कायदेशीर नोटीसा धाडल्या आहेत.
या राजकीय पार्श्वभूमीवर तसेच प्रतिभा पवार यांच्या शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अजितदादा सिल्वर ओकवर दाखल होऊन ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बरोबर चर्चा करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
Ajitdada filed on Silver Oak
महत्वाच्या बातम्या
- पवारनिष्ठ लिबरल मांडतात फडणवीसांच्या “राजकीय बळीची” कविकल्पना, पण ही खरी भाजप बळकटीकरण, एनडीए विस्ताराची मोदींची योजना!!
- पंतप्रधान मोदींना आणखी एक सर्वोच्च नागरी पुरस्कार; फ्रान्सचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘लिजन ऑफ ऑनर’ मिळवणारे ठरले पहिले भारतीय!
- भारतीयांसाठी अभिमानास्पद दिन! इस्रो आज श्रीहरिकोटा येथून ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करणार!
- जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जण ठार, राज्यात अलर्ट जारी!