राज्यातील महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करताना दिसून येत आहे.Ajit Pawar’s suggestive statement: He never asked for two wards, let’s see who benefits from three wards
विशेष प्रतिनिधी
पुणे : अजित पवार मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की तीनचा प्रभाग हे फायनल आहे. मी कधीच दोनचा प्रभाग मागितला नाही. तीन प्रभागांचा नेमका कोणाला फायदा होतो ते पाहू.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा असं माझं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आगामी महापालिकेच्या निवडणुका सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभाग रचनेनुसार होणार आहेत की वॉर्डप्रमाणे याबाबत अनेक दिवस अनिश्चितता होती. तसेच ऐन वेळेवर सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते, असं राजकीय पक्षांचं मत होतं.
परंतु दरम्यान, शहरांचा विस्तार वाढल्यानं सीमालगतचा भाग शहरात समाविष्ट केल्यास वॉर्डाची संख्या वाढू शकते. असं झाल्यास नव्याने वॉर्ड किंवा प्रभार रचना केली जाण्याची शक्यता असते.
राज्यातील महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करताना दिसून येत आहे. परंतु प्रभाग पद्धतीवरुन या तिनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं सरळ दिसत होतं. म्हणून अंतिम निर्णय होण्यास विलंब होत होता.दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज अखेर मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Ajit Pawar’s suggestive statement: He never asked for two wards, let’s see who benefits from three wards
महत्त्वाच्या बातम्या
- Cyclone Shaheen : ‘गुलाब’ सरले आता ‘शाहीन’ चक्रीवादळाचा धोका, आज तीव्र होणार, कोणत्या राज्यांना झोडपणार? वाचा सविस्तर…
- आनंदराव अडसुळ यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही ; सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब
- गोव्यातील पक्षांतरावर अंकुश आणण्यासाठी शिवसेनेकडे योजना; संजय राऊत यांची माहिती
- भावना गवळी “वर्षा”वरून “वाऱ्यावर”; मुख्यमंत्र्यांची भेट न मिळताच परतावे लागले !!