• Download App
    अजित पवारांच्या नागरिकांना कानपिचक्या , म्हणाले- दुसरा डोस घेतल्यानंतर लोक नियम पाळत नसल्यानं कोरोनाबाधितAjit Pawar's citizens were shocked, he said- after taking the second dose, people are not coroned because they are not following the rules.

    अजित पवारांच्या नागरिकांना कानपिचक्या , म्हणाले- दुसरा डोस घेतल्यानंतर लोक नियम पाळत नसल्यानं कोरोनाबाधित

    दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, फिजीकल डिस्टन्सिंगचं पालनं केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.Ajit Pawar’s citizens were shocked, he said- after taking the second dose, people are not coroned because they are not following the rules


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना विविध मुद्यांवर बोलले आहेत. कोरोना लसीकरण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालनविषयी अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, फिजीकल डिस्टन्सिंगचं पालनं केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

    पुण्यात ७५ तास लसीकरण

    पुण्यात तीन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम घेणार आहोत. ७५ तास लसीरकरण करण्याचा आमचा मानस असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. सीएसआरमधून ५ लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.



    पुढे अजित पवार म्हणाले की , कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या एक लाख सिरींज पुणे शहरात सिरींज घेण्यात आली आहेत. आम्ही ग्रामीण भागातही सिरींज देणार आहोत.

    पुणे महापालिकेत २.१ कोरोनाबधित रेट आहे. कोरोनाची मागच्यावेळी पेक्षा परिस्थिती सुधारली आहे. पुण्यातील मृत्युदर २.१ आला आहे. पिंपरीचा थोडासा मृत्युदर वाढला आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

    पुण्यातील सक्रीय रुग्ण घटले

    पुण्यात मागील आठवड्यात ५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. नागरिक दुसरा डोस घेततयानंतर नियम पाळत नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, अशा कानपिचक्या अजित पवार यांनी पुणेकरांना दिल्या आहेत.

    Ajit Pawar’s citizens were shocked, he said- after taking the second dose, people are not coroned because they are not following the rules.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ammar Yashar : झारखंडमध्ये पकडलेला दहशतवादी अम्मार याशर, ‘इंडियन मुजाहिदीन’नंतर HUT मध्ये होता सक्रिय

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Terrorist Pannu : पहलगाम हल्ल्यानंतर खलिस्तानी दहशतवादी पन्नूने पुन्हा गरळ ओकली