• Download App
    अजित पवारांचा मोठा डाव! जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाडांच्या अपात्रतेसाठी कालच विधानसभा अध्यक्षांना दिलं पत्र! Ajit Pawars big move A letter was given to the Assembly Speaker yesterday for the disqualification of Jayant Patil and Jitendra Awhad

    अजित पवारांचा मोठा डाव! जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाडांच्या अपात्रतेसाठी कालच विधानसभा अध्यक्षांना दिलं पत्र!

    ‘’राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत, आमच्यावर कारवाईचा कुणालाही अधिकार नाही.’’ असंही सांगितलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. कालच्या महाभूकंपानंतर आजही मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहेत. शरद पवारांच्या आदेशावरून बंडखोर आमदारांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्फत अपात्रतेची कारवाई सुरू झालेली असताना, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा डाव टाकला आहे.  आज पत्रकारपरिषद घेत अजित पवारांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्यासाठी आम्ही कालच विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल् असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता मोठा राजकीय पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे. Ajit Pawars big move A letter was given to the Assembly Speaker yesterday for the disqualification of Jayant Patil and Jitendra Awhad

    “मी माध्यमांमध्ये पाहिलं की, नऊ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी असं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलं आहे. मी सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि पक्षाने निवडून दिलेला विधीमंडळ पक्षनेता आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याच्या संदर्भात कालच विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं आहे.” असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

    याशिवाय, ‘’राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार  आमच्यासोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हीच आहोत, आम्ही जे काही करतोय ते पक्ष हितासाठीच करतोय, त्यानुसार प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.’’ असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

    याशिवाय, आमच्याबरोबरच्या आमदारांचं भवितव्य कसं व्यवस्थित राहिल याची खबरदारी आम्ही घेत आहोत. कुणीही काहीही सांगितलं तरीही आमच्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ शकत नाही. काहींनी आमच्या विरोधात नोटीस काढली आहे, मात्र तो अधिकार कुणालाही नाही. या गोष्टी करत असताना पक्ष आणि चिन्ह आमच्याच बरोबर आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मी महाराष्ट्रात पक्ष मजबूत करेन. मी पक्षाच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेतले आहे. मी सर्व आमदार आणि जिल्हा परिषद नेत्यांची बैठकही बोलावली आहे, असं  सुनील तटकरे म्हणाले आहेत.

    Ajit Pawars big move A letter was given to the Assembly Speaker yesterday for the disqualification of Jayant Patil and Jitendra Awhad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!