वृत्तसंस्था
कणकवली : ‘उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध घोटाळ्यांची चौकशी टाळण्यात माहीर’ आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कणकवलीत आली असून यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.’Ajit Pawar is avoiding Inquiry of various scams’; Narayan Rane Allegation
अजित पवार यांचे हात साखर कारखान्याच्या गैरव्यहारात गुंतल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कर्ज प्रकरण आणि पवार यांच्या नातलगांनी तो खरेदी केल्याचे उघड झाले आहे. प्रथम कारखाने कर्जबाजारी करायचे नंतर अवसायनात काढून नंतर ते स्वतः खरेदी करायचे, असा धंदा अनेक वर्षे सुरु आहे.
राज्यातील ४० पेक्षा अधिक कारखाने अशा प्रकारे गिळंकृत केले आहेत. सहकारी बँकेचा पैसे त्यासाठी वापरल्याबद्दल कलम १२० ब आणि ४२० अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. या घोटाळ्यांची चौकशी टाळण्यात पवार हे माहीर असल्याचा घणाघात राणे यांनी केला.
केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्यातून राज्याला काय निधी मिळणार? असा सवाल करत अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर नारायण राणे यांनी कणकवलीत पवार यांना पत्रकार परिषदेत जोरदार उत्तर दिले.
Ajit Pawar is avoiding Inquiry of various scams’; Narayan Rane Allegation
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांची मोठी घोषणा – आता दरवर्षी पाचशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री कार्यालयात इंटर्न म्हणून नियुक्त केले जाणार
- तालिबानने पाकिस्तानच्या तोंडावर चापट मारली, म्हणाला- टीटीपी तुमची समस्या आहे आमची नाही, ती तुम्हीच सोडवा
- ‘अजित पवार घोटाळ्यांची चौकशी टाळण्यात माहीर’; नारायण राणे यांचा कणकवलीत जोरदार घणाघात