प्रतिनिधी
मुंबई – विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा अजून सुटलेला नसताना त्याच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव राष्ट्रवादी कटाप करेल, अशी चिन्हे दिसायला लागली आहेत. किंबहुना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यातून तसे संकेत मिळत आहेत. Ajit Pawar hints at Raju Shetti`s name droped from MLC list
निवडणूकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची जागा मिळू शकत नाही अशी नवी माहिती समजल्याचे वक्तव्य अजित पवारांनी करून राजू शेट्टींना गॅसवर ठेवले आहे. राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेला पराभूत झाले आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
मला विधान परिषदेची जागा देऊन राष्ट्रवादी मेहेरबानी करत नाही. तर शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी समझोता झाला होता. त्यानुसार मला विधान परिषदेची जागा मिळाली पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
तत्पूर्वी, अजित पवार म्हणाले की निवडणूकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल, तर अशा व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून नेमता येत नाही, अशी नवी माहिती समजली आहे. त्यामुळे आता राज्यपालांना दिलेल्या यादीत काही बदल करावा लागला तर मुख्यमंत्री तसा निर्णय घेतील, असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.
त्यावर राजू शेट्टी यांनी संतापून प्रत्युत्तर दिले आहे. विधान परिषदेची जागा देऊन राष्ट्रवादी कोणती मेहेरबानी करीत नाही. शरद पवारांच्या दिल्लीतल्या घरी तसा समझोता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी झाला होता. हातकणंगलेची जागा, सांगलीची जागा आणि विधान परिषदेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यायची. विधान परिषदेवर स्वाभिमानीचा उमेदवार राष्ट्रवादीने निवडून आणायचा हे आधीच ठरले होते, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
-प्रत्यक्षात राष्ट्रवादीतून राजू शेट्टींना जबरदस्त विरोध
प्रत्यक्षात राष्ट्रवादीतून राजू शेट्टींना जबरदस्त विरोध होतो आहे. कारण राजू शेट्टींचे राजकारण दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला नेहमीच अडचणीचे ठरले आहे. राजू शेट्टी यांनी नुकताच पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता. या मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसते.
मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केली होती. एवढेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त आश्वासने देऊन गेले. ज्यांना शेती कळत नाही त्यांनी मदत केली. मात्र, ज्यांना ती कळते त्यांनी मदत द्यायला टाळाटाळ केली, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता.
आता राष्ट्रवादीने राजू शेट्टींचे नाव वगळून सरकारवरील टीकेचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे.
Ajit Pawar hints at Raju Shetti`s name droped from MLC list
महत्त्वाच्या बातम्या
- GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या
- तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी
- मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका