विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रमुखपदी एअर मार्शल संजीव कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपूर यांनी रविवारी लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांच्याकडून पदभार स्वीकारला. सैन्यदलात ३९ वर्षे सेवा बजावून असित मिस्त्री निवृत्त झाले.Air Marshal Sanjeev Kapoor as the head of NDA
एअर मार्शल कपूर हे एनडीएच्या ६७ व्या तुकडीतील माजी प्रशिक्षणार्थी आहेत. तसेच फ्लाइंग इन्स्ट्रक्टर स्कूल, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. तर १९८५ मध्ये ते भारतीय हवाईदलात रुजू झाले. आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी विविध विमानाद्वारे सात हजार ८०० तासांहून अधिक मुक्त उड्डाण केले आहे. त्यांनी संरक्षण अभ्यासात एम.एस्सी, मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी आणि एम.फील केले आहे. त्याचबरोबर सध्या ते उस्मानिया विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.
WOMEN IN NDA : एनडीए प्रवेशासाठी UPSC ने महिला उमेदवारांकडून मागविले अर्ज
फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून एअर मार्शल कपूर यांनी एअर फोर्स ॲकॅडमी येथे जबाबदारी पार पाडली. त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक सराव आणि ऑपरेशन्समध्ये भाग घेतला आहे. एअर टू एअर रिफ्यूलिंग (हवाई मार्गाने इंधनपुरवठा), युद्ध कारवाईमध्ये त्यांनी नेतृत्व केले असून याचा चांगला अनुभव त्यांना आहे. ते भारतीय हवाई दलातील हवेतल्या हवेत इंधन भरण्याच्या कार्यप्रणालीमध्ये त्यांना चांगलाच अनुभव आहे. यासाठी त्यांनी परदेशातून प्रशिक्षण घेतले होते. ‘एअर टू एअर रिफ्यूलिंग’ स्क्वाड्रनच्या प्रमुखपदासह विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांना वायुसेना पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
Air Marshal Sanjeev Kapoor as the head of NDA
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानात संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या, तालिबानने दोन आरोपींना केली अटक, एक फरार
- चीनच्या उलट्या बोंबा : म्हणे – कोरोनासाठी वुहान मार्केट नाही, तर सौदीचे झिंगे अन् ब्राझीलचं बीफ जबाबदार
- आंबा घाट जड वाहनांसाठी पुन्हा होणार खुला
- विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार