• Download App
    अहमदनगर : सेंट्रल एक्सलन्स इन्सि्टट्यूट उभारले जाणार ,३० कोटी रुपये खर्च ; उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती । Ahmednagar: Central Excellence Institute to be set up at a cost of Rs 30 crore; Information given by Higher Technical Education Minister Uday Samant

    अहमदनगर : सेंट्रल एक्सलन्स इन्सि्टट्यूट उभारले जाणार ,३० कोटी रुपये खर्च ; उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

    अहमदनगर शहर व नगर तालुका युवा सेनेच्या कार्यकर्ता मेळावा होता.यावेळी जिल्हा शिवसेनाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. Ahmednagar: Central Excellence Institute to be set up at a cost of Rs 30 crore; Information given by Higher Technical Education Minister Uday Samant


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : सध्या शिक्षणपद्धतीत मोठे बदल होत असल्याचे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे.अहमदनगर शहर व नगर तालुका युवा सेनेच्या कार्यकर्ता मेळावा होता.यावेळी जिल्हा शिवसेनाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.मेळाव्यात उदय सामंत बोलत होते.

    तेव्हा ते म्हणाले की, आगामी काळात जिल्ह्यातील शिक्षितांना स्वयंरोजगार निर्माण होणार आहे. रोजगार निर्माण व्हावा यासाठी३० कोटी रुपये खर्चून सेंट्रल एक्सलन्स इन्सि्टट्यूट उभारले जाणार आहे,अशी माहिती उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.



    तसेच उदय सामंत म्हणाले की , शिवसेनेत व्यक्तीपेक्षा पक्षाला महत्त्व दिले जाते. मी मंत्री जरी असलो, तरी प्रथम शिवसैनिक आहे. तसेच कार्यक्रमात शिवसैनिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी विचारल्या पाहिजेत.तसेच शहर व तालुक्यातील युवा वर्गासाठी ३० कोटी रुपये खर्चून सेंट्रल एक्सलन्सची उभारणी करण्यात येईल.विशेष म्हणजे त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी या इन्स्टिट्यूटची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

    दरम्यान या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर होते, तर शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, नगर पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, प्रवीण कोकाटे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, युवा तालुका प्रमुख प्रवीण गोरे व्यासपीठावर होते.

    Ahmednagar : Central Excellence Institute to be set up at a cost of Rs 30 crore; Information given by Higher Technical Education Minister Uday Samant

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस