विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यवतमाळ येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात केवळ सात ते आठ जणांनी सहभाग घेतला.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरूवारी करण्यात आले. यावेळी वेगळ्या विदर्भ राज्याबाबत घोषणाबाजी करण्यात आली. अवधूतवाडी पोलीसांनी सात ते आठ जणांना स्थानबद्ध केले आहे.Agitation for a separate Vidarbha state, only 7 to 8 came into the agitation
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षापासून समिती लढा देत आहे. मात्र शासनाने त्यांची कुठलीच दखल घेतलेली नाही,असा समितीचा आरोप आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आर्णीरोडवरील अभ्यंकर कन्या शाळेसमोर रस्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
यावेळी विदर्भाचे स्वतंत्र राज्य करण्यात यावे, कोरोना काळातील वीज बिल माफ करून ते शासनाने भरावे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.
Agitation for a separate Vidarbha state, only 7 to 8 came into the agitation
महत्त्वाच्या बातम्या
- तेलंगणात “नारायण राणे.”…; मल्ला रेड्डींचे भर स्टेजवर मांडी आणि शड्डू ठोकून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना आव्हान
- काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; परदेशी नागरिकांना सावधानतेचा इशारा
- ‘हसके लिया अफगाणिस्तान लढके लेंगे पाकिस्तान’; तालिबानी प्रवृत्तीची अमेरिकेला धास्ती; अण्वस्त्रही तालिबानी बळकावेल ?
- यूपीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होणार FIR दाखल, ठाकरेंच्या अडचणीत होणार वाढ