प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यलयानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यलयातही शिंदे गटाने प्रवेश मिळवला आहे. शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांना ही माहिती दिली आहे. After the Maharashtra Legislature offices, now the Parliament office also belongs to the Shinde group
केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर, शिंदे गट आता शिवसेनेच्या कार्यालयात प्रवेश करत आहे.
ठाकरे की शिंदे वादात एडव्हांटेज शिंदे; धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
– उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
शिवसेना पक्षातील प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पाहायला मिळाले. दोन्ही गटांनी अनेक दावे – प्रतिदावे केले. तसेच, आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. अशातच शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
After the Maharashtra Legislature offices, now the Parliament office also belongs to the Shinde group
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या दिवंगत वडिलांची खिल्ली उडवल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरुद्ध वाराणसी आणि लखनऊमध्ये एफआयआर
- तुर्कस्तान-सीरियात पुन्हा भूकंप : 6.4 तीव्रता, इस्रायलपर्यंत जाणवले धक्के, 3 ठार, 213 जखमी
- मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल