• Download App
    After the death of Girish Bapat, in just three days, Congress Vadettivar's by-election mess

    गिरीश बापटांच्या निधनानंतर तीनच दिवसांत काँग्रेसच्या वडेट्टीवारांची पोटनिवडणुकीची गडबड; अजितदादांनी संतापून सुनावले!! 

    प्रतिनिधी

    पुणे : भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा वाद झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना चांगलेच सुनावले. After the death of Girish Bapat, in just three days, Congress Vadettivar’s by-election mess

    काय म्हणाले वडेट्टीवार?

    एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोट निवडणूक लढवणार आहोत. भाजपाने यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेकदा उमेदवार दिले आहेत. त्यामुळेच आता ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, ती पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवेल.



    अजित पवार संतापले

    विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी त्यांना चांगलेच सुनावले. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाले आहेत. घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधाने केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असे लोकं म्हणतील, असे अजित पवार म्हणाले.

    After the death of Girish Bapat, in just three days, Congress Vadettivar’s by-election mess

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ