• Download App
    'योगी नाही हा तर भोगी… असं वाटलं त्याच चपलेनं थोबाड फोडावं' : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, अटकेची मागणी । After Narayan Rane Arrest Now CM Uddhav Thackeray Clip viral on Social Media Saying To slap CM Yogi Adityanath

    ‘योगी नाही हा तर भोगी… असं वाटलं त्याच चपलेनं थोबाड फोडावं’ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, अटकेची मागणी

    Narayan Rane Arrest : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ‘आक्षेपार्ह’ वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले आहेत. व्हिडिओ शेअर करत काही नेटकरी आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याही अटकेची मागणी करत आहेत. After Narayan Rane Arrest Now CM Uddhav Thackeray Clip viral on Social Media Saying To slap CM Yogi Adityanath


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ‘आक्षेपार्ह’ वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले आहेत. व्हिडिओ शेअर करत काही नेटकरी आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याही अटकेची मागणी करत आहेत.

    उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

    मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ 2018 चा आहे. उद्धव ठाकरे हे विधान करताना पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रॅलीला संबोधित करत होते. त्या वेळी उद्धव ठाकरे योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करताना म्हणाले होते की, “काल आदित्यनाथ आले होते. योगी! अरे, हा कशाचा योगी, हा तर भोगी आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसतो, हा कसला योगी आहे! उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं हे या योग्याला सांगायला पाहिजे. शिवरायांचा राज्याभिषेक करायला उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायांना राज्याभिषेक केला होता. आणि हा जो योगी आला की, गॅसच्या फुग्यासारखा, काही असो नसो हवेत उडत असतो. तसा हा गॅसचा फुगा. आला की सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. असं वाटलं त्याच चपला घेऊन त्याचं थोबाड फोडावं. हा अपमान केवळ योगीनी नाही केलेला….”

    उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “माझ्याकडे त्यांच्यापेक्षा (उद्धव ठाकरे) अधिक सौजन्य आहे आणि श्रद्धांजली कशी द्यावी हे मला माहिती आहे. मला त्यांच्याकडून काही शिकण्याची गरज नाही.”

    आता हा जुना व्हिडिओ पाहता एका युजरने लिहिले, “योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल उद्धव ठाकरेंना लखनऊमध्ये तुरुंगवास भोगावा लागेल.” दुसरीकडे, आणखी एका युजरने म्हटले की, “महाराज जी, या प्राण्याचे तुमच्याबद्दलचे तुच्छ विचार मनाला खूप वेदनादायक आहेत. मी उत्तर प्रदेश पोलिसांना विनंती करतो की, या प्राण्याला लवकरात लवकर अटक करून तुरुंगात टाका. या विधानामुळे केवळ योगीच नाही, तर सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला आहे.”

    दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरेंचा 3 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. राणेंवर आरोप आहे की, त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल म्हटले की, “हे लज्जास्पद आहे की मुख्यमंत्र्यांना आपण स्वतंत्र होऊन किती वर्षे झाली हे माहिती नाही. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी मागे वळून आपल्या सहकाऱ्याला विचारले. जर मी तिथे असतो तर मी तिथेच थापड मारली असती.”

    नारायण राणेंच्या अटकेने राज्यातील राजकारण पार ढवळून निघाले आहे. दुसरीकडे, भाजपने राणेंच्या वक्तव्याला समर्थन नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु राणेंवर होणाऱ्या कारवाईला भाजपने कडाडून विरोध केला असून पक्ष याबाबतीत पूर्णपणे राणेंच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.

    After Narayan Rane Arrest Now CM Uddhav Thackeray Clip viral on Social Media Saying To slap CM Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती