• Download App
    राष्ट्रवादीतील फुटीच्या बातम्या दिवसभर चालल्यानंतर अजितदादांचे सायंकाळी 6.30 नंतर ट्विटद्वारे खुलासे!!|After day long media uproar of NCP splits, ajit Pawar clarifies some facts in evening

    राष्ट्रवादीतील फुटीच्या बातम्या दिवसभर चालल्यानंतर अजितदादांचे सायंकाळी 6.30 नंतर ट्विटद्वारे खुलासे!!

    प्रतिनिधी

    मुंबई : दिवसभर सोमवारी राष्ट्रवादीतील फुटीच्या बातम्या चालल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगवेगळी ट्विट करून सायंकाळी 6.30 नंतर काही खुलासे केले आहेत.After day long media uproar of NCP splits, ajit Pawar clarifies some facts in evening

    अजितदादा पूर्वनियोजित कार्यक्रम सोडून अचानक मुंबईला निघून गेले. ते देवगिरी बंगल्यावर गेले. दरम्यानच्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार तातडीने दिल्लीला गेले. तेथे त्यांनी काही महत्त्वपूर्ण चर्चा केल्या. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार आहे, अशा बातम्या बहुतांश मराठी माध्यमांनी दिल्या होत्या.

    अजितदादा पुण्यात काही कार्यक्रमांना आणि नंतर सासवडच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. परंतु ऐनवेळी ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना सासवडच्या शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहावे लागले, असेही मराठी माध्यमांच्या बातम्या म्हटले होते.



    राष्ट्रवादी संदर्भात आज दिवसभर याच बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आणि त्यानंतर सोशल मीडियामध्ये चालल्या. त्यावर सर्वत्र चविष्ट चर्चा रंगल्या. अनेकांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या फुटीचा आकडा सांगितला तो 40 पर्यंत नेऊन भिडवला.

    संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरे यांचा नेमका संवाद काय झाला याचा खुलासा केला. राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार नाही. ज्यांना जायचे असेल ते वैयक्तिकरित्या जातील. त्यांचा पक्षाशी संबंध असणार नाही, असे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टपणे सांगितल्याचे संजय राऊत म्हणाले. ती बातमीही दिवसभर चालली. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे आणि अण्णा बनसोडे यांनी उघडपणे अजितदादांना पाठिंबा व्यक्त करणारी वक्तव्य केली.

    त्या दरम्यानच्या काळात अजितदादा कोणताही स्पष्ट खुलासा केला नव्हता. पण सायंकाळी 6.30 नंतर त्यांनी वेगवेगळी ट्विट करून राष्ट्रवादीतील घडामोडी संदर्भात आपल्या बाजूने काही खुलासे केले आहेत.

    अजितदादांची ट्विट

    खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो.

    सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे.

    मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.

    अजितदादांच्या या स्पष्ट खुलाशांमुळे राष्ट्रवादी त्यांची स्वतःची नेमकी बाजू काय आहे?, हे आज दिसून आले.

    After day long media uproar of NCP splits, ajit Pawar clarifies some facts in evening

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस