• Download App
    भाजप पाठोपाठ राज ठाकरेंचे टार्गेटही बारामती; पुणे दौऱ्यात मनसेत इनकमिंगAfter BJP, Raj Thackeray's target is also Baramati

    भाजप पाठोपाठ राज ठाकरेंचे टार्गेटही बारामती; पुणे दौऱ्यात मनसेत इनकमिंग

    प्रतिनिधी

    पुणे : भाजप पाठोपाठ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टार्गेटवरही बारामती लोकसभा मतदारसंघाला आहे. राज ठाकरे यांच्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात मनसेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार आहेत. पुणे महापालिका, मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महत्वाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे महाराष्ट्रातील दौरे देखील वाढले आहेत. After BJP, Raj Thackeray’s target is also Baramati

    राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. खडकवासला, भोर, वेल्हा आणि मुळशीतील काही पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत.



    वसंत मोरे यांच्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुरूवारी पुण्यात राज ठाकरे दाखल झाले असून ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे मनसेने विशेष लक्ष केंद्रित केल्यावर या मतदारसंघाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यावेळी मनसेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

    भाजपने आधीच बारामती मतदारसंघ हे आपले टार्गेट निश्चित करून त्या मतदारसंघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा व्यापक दौरा घडवून आणला आहे. इथून पुढे देखील 2024 ची लोकसभा निवडणूक होईपर्यंत निर्मला सीतारामन यांचा बारामतीतला राजकीय राबता कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने देखील बारामती लोकसभा मतदारसंघात ताकद वाढविण्याचा मनसुबा व्यक्त करून तसे प्रयत्न चालवले आहेत. ते नेमके कोणाच्या राजकीय पथ्यावर पडणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    After BJP, Raj Thackeray’s target is also Baramati

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस