After Bail Narayan Rane Press Today : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी झालेल्या जेल व बेलनंतर आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. नारायण राणे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. तत्पूर्वी, त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी एक ट्वीट करून मोठं वक्तव्य केलं आहे. नितेश राणे म्हणाले की, हा राज्य प्रायोजितच हिंसाचार होता हे सिद्ध झाले. या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एकमेव मार्ग आहे. After Bail Narayan Rane Press Today, Nitesh Rane Says Presidents rule is the only way out to ensure safety from thugs
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी झालेल्या जेल व बेलनंतर आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. नारायण राणे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. तत्पूर्वी, त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी एक ट्वीट करून मोठं वक्तव्य केलं आहे. नितेश राणे म्हणाले की, हा राज्य प्रायोजितच हिंसाचार होता हे सिद्ध झाले. या ठगांपासून वाचण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एकमेव मार्ग आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या त्या वक्तव्यानंतर त्यांच्या जुहू येथील घरासमोर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठे आंदोलन करत ठिकठिकाणी दगडफेक केली होती. यानंतर संध्याकाळी युवा सेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. नितेश राणे यांनी या भेटीचा फोटो ट्विट करत त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, याचा अर्थ पश्चिम बंगालप्रमाणे हासुद्धा राज्य पुरस्कृत हिंसाचार होता. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्याची सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे. पण ते तर गुंडांचा सत्कार करताना दिसत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे. त्यामुळे या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग आहे!
नारायण राणे यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज दुपारी 4 वाजता त्यांच्या जुहु येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी राणे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेतून नारायण राणे ठाकरे सरकारचे वाभाडे काढणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, यावेळी राणे काही नवे गौप्यस्फोट करणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
कालच्या आंदोलनानंतर युवा सेनेचे ठाकरेंकडून कौतुक!
काल रात्री युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाइल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल्याचं सांगितलं जात आहे.
After Bail Narayan Rane Press Today, Nitesh Rane Says Presidents rule is the only way out to ensure safety from thugs
महत्त्वाच्या बातम्या
- पलटवार : आता भाजपकडून उद्धव ठाकरेंविरुद्ध 5 पोलीस ठाण्यांत तक्रारी, मुख्यमंत्री योगींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रकरण
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर : केंद्राकडून उसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा
- केवळ ४००० अमेरिकी नागरिक आणायचे होते, मग २६,००० एअरलिफ्ट कसे केले? दहशतवादी तर आणले नाहीत ना? ट्रम्प यांची बायडेन सरकारवर कडाडून टीका
- अफगाणिस्तानच्या आयटी मंत्र्यांवर जर्मनीत पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ, मंत्रिपदी असताना देशात सेल फोन नेटवर्क वाढवले
- राणेंच्या अटकेनंतर रात्रभर प्रसाद लाड यांना जिवे मारण्याच्या धमक्यांचे फोन, लाड म्हणाले- धमक्यांना भीक घालणार नाही!