• Download App
    अनिल देशमुखांपाठोपाठ परमवीर सिंगांना देखील सुप्रीम कोर्टाचा दणका; आधी कुठे आहात ते सांगा मग याचिकेचे पाहू!! After Anil Deshmukh, Paramvir Singh was also slapped by the Supreme Court

    अनिल देशमुखांपाठोपाठ परमवीर सिंगांना देखील सुप्रीम कोर्टाचा दणका; आधी कुठे आहात ते सांगा मग याचिकेचे पाहू!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एसआयटी चौकशीला आव्हान देणारी अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली त्यापाठोपाठ परमवीर सिंग यांना देखील दणका दिला आहे.After Anil Deshmukh, Paramvir Singh was also slapped by the Supreme Court

    तुम्हाला अटकेपासून संरक्षण द्यायचे की नाही ते नंतर पाहू. परंतु तुम्ही देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात नेमके कुठे आहात?, हे पहिल्यांदा सांगा!!, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने परमवीर सिंग यांना फटकारले आहे.

    परमवीर सिंग यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात अटकेपासून संरक्षणाची याचिका दाखल केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने परमवीर सिंगांच्या ठावठिकाण्यावरून त्यांच्या वकिलांना सुनावले आहे. आधी परमवीर सिंग यांनी कोर्टात आपण नेमके कोठे आहोत हे सांगावे. देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात ते कुठे आहेत? याची माहिती द्यावी. मग त्यांच्या याचिकेवर काय निर्णय घ्यायचा? त्यांना अटकेपासून संरक्षण द्यायचे की काय करायचे?, हे पाहू, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

    त्यामुळे अनिल देशमुख आणि परमवीर सिंग या दोघांच्याही प्रकरणांमध्ये बाहेर कितीही आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय गदारोळ सुरू असला तरी सुप्रिम कोर्टाने मात्र दोघांनाही कायद्याच्या लाईनीत एकाच कसोटीवर तोलत निकाल दिला आहे.

    After Anil Deshmukh, Paramvir Singh was also slapped by the Supreme Court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस