प्रतिनिधी
नाशिक : समृद्धी महामार्गावर गोंदे येथील टोलक्यावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवल्याचा राग मनात धरून मनसैनिकांनी टोल नाक्यावर तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि.२३) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. टोलनाक्या विरोधात आंदोलनास मनसेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यातच समृद्धी महामार्गावर टोलनाका तोडफोडीची ही पहिलीच घटना घडली आहे. After Amit Thackeray’s convoy was blocked, the Gonde toll booth was vandalized by the militants
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमीत ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी शनिवारी (दि. २२) शिर्डीमार्गे समृद्धी महामार्गावरून सिन्नरकडे येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या गोंदे टोल नाक्यावर त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यांनी ओळख देऊनही टोलनाका प्रशासनाने आर्धा तास थांबून ठेवले. टोल उतरून संगमनेर कडे रवाना झाल्यानंतर मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सिन्नर आणि नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली.
उपजिल्हाध्यक्ष शैलेश येलमामे, तालुकाध्यक्ष विलास सांगळे, तालुका संघटक चेतन दराडे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा पालवे, रामदास खैरनार, शहर सरचिटणीस अमित कांबळे, अस्मिता सरवार यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास टोल नाक्यावर जाऊन अमित ठाकरे यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल व्यवस्थापनाला जाब विचारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या उपस्थितीत टोलनाका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर या विषयावर पडदा पडला.
मात्र नाशिक येथील पदाधिकाऱ्यांच्या मनात राग कायम राहिल्याने त्यांनी रात्री २ वाजेच्या सुमारास येत टोलनाक्याच्या केबिनच्या काचा फोडल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देत हातातील दांडक्याने केबिनच्या काचा फोडून मनसैनिक तेथून पसार झाले. नाशिक शहराचे अध्यक्ष दिलीप दातीर, विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे, मनविसे प्रदेश कार्यकारणी सदस्य शशी चौधरी, बाजीराव मते, शहर संघटक ललित वाघ, मनविसे निफाड तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, निफाडचे माजी तालुका अध्यक्ष शैलेश शेलार यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
After Amit Thackeray’s convoy was blocked, the Gonde toll booth was vandalized by the militants
महत्वाच्या बातम्या
- भाजपा लखनऊमध्ये घेणार पसमंदा परिषद, मुस्लिमांशी करणार चर्चा
- मणिपूरमध्ये आणखी 2 मुलींवर गँगरेप, दोघांचीही हत्या; जमावासोबत आलेल्या महिलांनीच रेपसाठी दिली चिथावणी
- तिहार तुरुंगातील चार अधिकारी निलंबित, यासीन मलिकच्या हजेरीबाबत निष्काळजीपणाचा आरोप
- पोस्टर्स लावून मुख्यमंत्री होता येत नाही, त्याला 145 आमदार लागतात पण…; हसन मुश्रीफांची टोलेबाजी