• Download App
    मुत्र शब्दप्रयोग :अजित पवारांचा आणि राज ठाकरेंचा साम्य आणि विरोध...!! After ajit pawar raj thackeray used "urinite" wording

    मुत्र शब्दप्रयोग :अजित पवारांचा आणि राज ठाकरेंचा साम्य आणि विरोध…!!

    प्रतिनिधी

    पुणे : बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मूत्र शब्द प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे निमित्त आहे राज ठाकरे यांच्या तिरकस वक्तव्याचे…!! After ajit pawar raj thackeray used “urinite” wording

    काही वर्षांपूर्वी अजित पवारांनी ‘आता धरणात मुतायचं का?’, असे उद्गार काढून प्रतिष्ठित व्हाईट कॉलरांचा रोष ओढवून घेतला होता. आता पवारांच्या पंक्तीत राज ठाकरेही बसले आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या शहरांच्या नियोजनाबाबत सरकारचे वाभाडे काढताना मूत्र शब्दप्रयोग वापरला आहे आपल्याकडे चार-पाच जण एकत्र येऊन नुसते म्हटले तरी देखील आपल्या शहरांमध्ये पूर येतो, असे तिरकस वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुष्काळाच्या काळात केलेल्या “मूत्र शब्द प्रयोगाची” आठवण झाली. इथं दुष्काळ पडलाय. पाणीच नाही. आता काय धरणात मुतायचे?, अशा शब्दांमध्ये अजितदादांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.

    अजितदादांच्या या वक्तव्याची आठवण राज ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्यामुळे झाली आहे. राज यांची भाषाशैली आक्रमक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी भाषेचे ते अनुकरण करतात. त्यानुसार त्यांनी आजचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यातून शहराच्या गलथान नियोजनाचे वाभाडे त्यांनी काढले आहेत.

    काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राला दुष्काळानं प्रचंड ग्रासले असताना अजित पवारांनी ‘आता धरणात मुतायचं का?’, असे उद्गार काढून रोष ओढवून घेतला होता. चारचौघात प्रत्येकाच्या तोंडात येणारे शब्द अथवा वाक्यरचना सार्वजनिक व्यासपीठावर बोलत नाहीत, हा एवढा संकेत अजित पवारांनी पाळला नाही. आता पवारांच्या पंक्तीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही बसले आहेत.



    आज राज ठाकरे बोलले त्यामागे पूराचा संदर्भ आहे. आपली शहरे कशी नियोजनशून्य आहेत हे सांगताना राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलून गेले की, “तीस चाळीस लोकं मुतली तरी पूर येईल असे आपल्या शहरांचे नियोजन आहे.” त्यांचा सगळा भर होता, हे सांगण्यावर की शहरांमध्ये मिळेल त्या जागांवर इमारती बांधून, सांडपाण्याचा निचरा करण्याची सोय न करून शहरं बकाल केली आहेत. जरा जरी जास्त पाऊस पडला तरी निचऱ्याअभावी पूरासारखी स्थिती होते, असं राज यांना अधोरेखित करायचं होतं.

    केवळ शहर नियोजनच नाही तर एका राजकीय प्रश्नासंदर्भात बोलतानाही आज (२९ जुलै २०२१ रोजी) राज यांनी पुन्हा मुतणे या शब्दाचा वापर केला. राज यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात मांडलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना राज यांनी, “माझ्या भूमिका स्पष्ट असतात,” असं सांगितलं. मात्र पुढे बोलताना त्यांनी आपण वाटेल तसं, मनात येईल ते बोलत नाही असं सांगण्यासाठी, “बैल मुतल्यासारखा मी बोलत नाही,” हे वाक्य वापरलं. “मी चालता चालता काही बोलत नाही. चांगला निर्णय घेतला तर मी अभिनंदन केलं आहे आणि करत आलोय. माझा व्यक्तीला विरोध नसून धोरणाला विरोध आहे,” असं भाजपासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले.

    After ajit pawar raj thackeray used “urinite” wording

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!