• Download App
    पत्राचाळ घोटाळा : 9 तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊत ईडीच्या ताब्यात!! After 9 hours of interrogation, finally Sanjay Raut is in the custody of ED

    पत्राचाळ घोटाळा : 9 तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊत ईडीच्या ताब्यात!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी 7.00 वाजताच्या सुमारास ईडीचे 9 तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतले. त्यांची ईडीचे 10 अधिकारी सकाळपासून चौकशी करत होते. After 9 hours of interrogation, finally Sanjay Raut is in the custody of ED

    संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरू होती. काही वेळानंतर राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा हळूहळू वाढू लागला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यानंतर 9.30 तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे.


    Sanjay Raut : संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे इंदिराजी – देवकांत बरुआंची आठवण!!


    दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. ईडी अधिकाऱ्यांकडून राऊतांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास सुरू झाली. त्यानंतर वाजता संजय राऊत यांना आता 3.50 च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. आता ईडीचे अधिकारी बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात घेऊन जाणार आहेत.

    पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी रविवारी सकाळी 7.00 वाजताच ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) १० अधिकाऱ्यांच्या पथकाने संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील बंगल्यावर आणि नंतर दादरच्या घरावर छापेमारी केली.

    After 9 hours of interrogation, finally Sanjay Raut is in the custody of ED

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!