• Download App
    संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी Aerial inspection of Sant Tukaram Maharaj Palkhi Marg by Nitin Gadkari

    संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी

    पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण केले जाणार

    प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती. Aerial inspection of Sant Tukaram Maharaj Palkhi Marg by Nitin Gadkari

    याबाबत नितीन गडकरी यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली, शिवाय या हवाई पाहणीचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्यांनी शेअर केले आहेत.  गडकरी म्हणाले, ‘’श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५ जी) हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण ११ पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.’’

    हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर त्यांना तपास यंत्रणांची भीती का वाटतेय?- भाजपा

    याशिवाय ‘’सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.’’ अशी माहितीही गडकरींनी दिली आहे.

    पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड होणार –

    याचबरोबर ‘’पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.’’ असंही केंद्रीयमंत्री गडकरींनी सांगितलं आहे.

    Aerial inspection of Sant Tukaram Maharaj Palkhi Marg by Nitin Gadkari

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!