मुंबईतील शरद पवार यांच्या निवास स्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुनरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर लगेचच सातारा पोलिसांनी एका गुन्ह्यात त्यांचा ताबा घेतल्यानंतर आता पुण्यात सदावर्तेवर दाखल असलेला गुन्हा समोर आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – मुंबईतील शरद पवार यांच्या निवास स्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुनरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर लगेचच सातारा पोलिसांनी एका गुन्ह्यात त्यांचा ताबा घेतल्यानंतर आता पुण्यात सदावर्तेवर दाखल असलेला गुन्हा समोर आला आहे. या गुन्ह्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत होणार असल्याचे दिसत असून पुणे पोलिसही तपासाठी ताबा घेण्याची शक्यता आहे.Advocate gunratna sadavarte now radar on pune police, in bharti vidyapith police station case is registered against sadavarte
सातारा व कोल्हापूर येथील राजे असलेल्या खासदाराविषयी आक्षेपार्ह वकत्व्य केल्याच्या आरोपावरून अॅड. सदावर्ते यांच्य विरूध्द पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास पुणे पोलिस करीत
असून याप्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी नुकताच गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपासासाठी त्याचा ताबा पुणे पोलिस घेण्याची शक्यता आहे. सदावर्ते यांना शुक्रवारी सातारा न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांचा केव्हाही ताबा पुणे पोलिस घेऊ शकतात. त्यामुळे अॅड. सदावर्तेच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सातारा, पुणे आणि नाशिक येथे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
Advocate gunratna sadavarte now radar on pune police, in bharti vidyapith police station case is registered against sadavarte
महत्त्वाच्या बातम्या
- रशियन सैन्याचे काळजाचा थरकाप उडवणारे क्रौर्य ;२५ युक्रेनियन महिलांना ओलिस ठेवून बलात्कार, त्यापैकी ९ आता प्रेग्नंट; १६ वर्षांच्या शाळकरी
- राज ठाकरेंची साद आणि पंतप्रधानांच्या मतदारसंघातून प्रतिसाद ; लाऊडस्पीकरवर अजान विरुद्ध हनुमान चालिसा सुरू; हिंदू संघटनांनी 21 मंदिरांमध्ये लावले स्पीकर
- Akhand Bharat : वीर सावरकरांच्या संकल्पनेतील अखंड भारत आणि त्यांचे प्रत्यक्ष प्रयत्न!!
- Akhand Bharat : स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांच्या संकल्पनेतील अध्यात्मिक धरोहर!!