• Download App
    शिवसेना प्रवेशावर उज्ज्वल निकम यांनी केला खुलासा, आधी राऊत, मग एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण । Adv Ujjwal Nikam Cleares Doubts on His speculation Of Joining Shiv Sena in Jalgaon

    शिवसेना प्रवेशावर उज्ज्वल निकम यांनी केला खुलासा, आधी राऊत, मग एकनाथ शिंदेंच्या भेटीने चर्चांना उधाण

    Adv Ujjwal Nikam :  ज्येष्ठ विधिज्ञ तसेच राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या राजकारणात प्रवेशावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ते शिवसेने प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. गत महिन्यात त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. आता जळगाव दौऱ्यावर असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. Adv Ujjwal Nikam Cleares Doubts on His speculation Of Joining Shiv Sena in Jalgaon


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ज्येष्ठ विधिज्ञ तसेच राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या राजकारणात प्रवेशावरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ते शिवसेने प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. गत महिन्यात त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. आता जळगाव दौऱ्यावर असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

    एकनाथ शिंदे आणि उज्ज्वल निकम यांच्यातील भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही, परंतु या भेटीबाबत गुप्तता पाळण्यात आल्याने व ही भेट बंद दाराआड झाल्याने निकम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. गत महिन्यात जळगाव दौऱ्यावर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. आता एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतल्याने निकम यांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

    तथापि, या सर्व चर्चांवर अॅड. उज्ज्वल निकम यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, त्याचा तपशील आताच सांगता येणार नाही. यापूर्वी मी शरद पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. खासदार संजय राऊत आणि माझी गेल्या महिन्यातील भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येतात, असेही ते म्हणाले.

    Adv Ujjwal Nikam Cleare s Doubts on His speculation Of Joining Shiv Sena in Jalgaon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!