• Download App
    सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा तेजस मोरे विरोधात पोलिसांकडे अर्ज दाखल। Adv Pravin chavhan Filled his application to shivajingar police station and demanded register crime against Tejas more

    सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा तेजस मोरे विरोधात पोलिसांकडे अर्ज दाखल

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर करत खळबळ माजवून दिली होती. हा पेन ड्राईव्ह तेजस मोरेनेच फडणविसांना पुरवला असल्याचा आरोप वकिल प्रविण चव्हाण यांनी केला होता. आता याबाबत चव्हाण यांनी मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे. Adv Pravin chavhan Filled his application to shivajingar police station and demanded register crime against Tejas more


    विशेष प्रतिनिधी-

    पुणे : वकिल प्रविण चव्हाण यांनी तेजस मोरे आणि आणखी एका व्यक्तीविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि गोपनियतेचा भंग झाला असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर करत खळबळ माजवून दिली होती. हा पेन ड्राईव्ह तेजस मोरेनेच फडणविसांना पुरवला असल्याचा आरोप वकिल प्रविण चव्हाण यांनी केला होता.

    स्टिंग आपरेशनमधील फुटेजद्वारे विधानसभेत सरकारी वकील आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या सगळ्यामध्ये फडणवीस यांना हा सर्व डाटा तेजस मोरे याने ही सर्व माहिती फडणवीसांना पुरवल्याचा आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला होता. तेजस मोरे हा जळगावातील रहिवासी असून, सध्या मोरे याचे वास्तव्य जळगावात नसून, त्याचे घर भाड्याने देण्यात आल्याची माहिती आहे.

    मोरे याचे जळगावमधील जिल्हा परिषद कॉलनी येथे घर असून, मोरे कुटुंबिय बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी वास्तव्यास नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. गेल्या सहा ते सात वर्षांपासून तेजस हा पुण्याला राहत असल्याचे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. तेजस मोरे हा जळगाव जिल्हा परिषद येथील अभियंत्याचा मुलगा असून, त्याच्यावर यापूर्वीही जळगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय पुण्यातल्या एका इमारत बांधकाम घोटाळ्यातही तेजसचं नाव आहे.



    चव्हाण यांनी आरोपांना उत्तर देताना सांगितले होते की, “या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. आरोप करणाऱ्यांनी ज्या केसचा आधार घेतला आहे, त्याची कागदपत्रे जर आपण पाहिली तर त्यामध्ये दिसून येतं की गिरीश महाजनांची त्या गुन्ह्यात काय भूमिका आहे. याचा तपास सुरु असून तपास अधिकाऱ्यांनी ही फाईल हायकोर्टात मांडली आहे .माझ्या कार्यालयात नेहमी येणारा आशील तेजस मोरे यांना आपल्या घडाळ्यात छुपा कॅमेरा लावून हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. त्याचा जामीन अर्ज माझ्याकडे होता, त्याचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्‍यता आहे, ते घड्याळ त्यानंच आणलेलं होतं. त्यानं मला एसी बसवून देतो असंही म्हटलं होतं. पण मी त्याला नकार दिला होता.

    ऍड चव्हाण यांना तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, त्यावर माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल – अनिता मोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर)

    Adv Pravin chavhan Filled his application to shivajingar police station and demanded register crime against Tejas more

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल