महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनचे अनेक रुग्ण सापडले असल्याने राज्य सरकार आता पुन्हा एकदा तयारीला लागले आहे.Aditya Thackeray writes letter to Union Health Minister Mansukh Mandvia; ‘this’ various demands made
विशेष प्रतिनिधी
मुंबई: ओमायक्रॉन या विषाणूचा सगळीकडेच वेगाने प्रसार होत आहे.महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनचे अनेक रुग्ण सापडले असल्याने राज्य सरकार आता पुन्हा एकदा तयारीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र पाठवले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना एक पत्र लिहून विविध मागण्या केल्या आहेत.कोरोना त्याच सोबत ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने आता कोरोनायोद्ध्यांन तिसरा डोस देण्यात यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे.
पुढे आदित्य ठाकरेंनी पत्रात लिहिलं आहे की, राज्यात १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण सुरू आहे, मात्र लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे लसीकरणाची वयोमर्यादा १८ वरून १५ वर्षे करावी, त्याच सोबत लसीकरणामधील अंतर देखील कमी करण्यात यावे ज्यामुळे लसीकरणाला वेग येण्यास आणखी मदत होईल.