प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच, आता शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडखोरीनंतर आता आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइलवरुन मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे. Aditya Thackeray to step down as minister Changes in social media profiles
– शिंदेंचा दावा ठरला खरा
सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी आमदार येणार असल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा आता खरा ठरला आहे. गुवाहाटी विमानतळावर आणखी एक सेनेचा आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झाला आहे. आमदार योगेश रामदास कदम हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.
– योगेश कदमांचा शिवसेनेला घरचा आहेर
अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्यांना रसद पुरवण्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर झाला होता. त्यानंतर रामदास कदम हे विधान परिषदेतून निवृत्त झाले होते. पण सेनेने त्यांना संधी दिली नाही. योगेश कदम यांनाही पक्षाने डावलले होते. यामधूनच योगेश कदम यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
Aditya Thackeray to step down as minister Changes in social media profiles
महत्वाच्या बातम्या
- 1992 – 2022 : पवारांच्या भरवशावर 25 वर्षे चालणारे सरकार 2.5 वर्षात धोक्यात!!; शिवसेनेच्या 29 आमदारांचे बंड!!
- भाजप संसदीय मंडळाची आज बैठक : पक्ष राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडण्याची शक्यता, निवडणुकीसाठी 14 सदस्यांची टीम तयार
- ठाकरे – पवार सरकार धोक्यात : एकनाथ शिंदेंचे 13 आमदारांसह बंड!!; सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम!!