• Download App
    प्रदूषण कमी करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी चालवली कार 'इलेक्ट्रिक कार ' , सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी मिळाला चांगला प्रतिसाद Aditya Thackeray drives electric car to reduce pollution, gets good response from all cities

    प्रदूषण कमी करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी चालवली कार ‘इलेक्ट्रिक कार ‘ , सर्वच शहरांमधून मिळाला चांगला प्रतिसाद

    सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्थानके वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.Aditya Thackeray drives electric car to reduce pollution, gets good response from all cities


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे.इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने आज मुंबईत इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले.अदानी इलेक्ट्रिसिटी या रॅलीचे प्रायोजक होते.

    या रॅलीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार चालवून या रॅलीत सहभागही घेतला.यावेळी ऑटोकारचे प्रमुख सोराबजी, अदानी इलेक्ट्रिसिटीचे जी.अदानी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



    यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की , मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होतोय. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे. प्रदूषण कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे. सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्थानके वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

    महालक्ष्मी रेसकोर्स पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमार्गे विक्रोळी या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये टाटा, टेस्ला, वोल्वो, ऑडी, जग्वार, मर्सिडीज, एमजी, ह्युंडाई अशा विविध कंपन्यांची सुमारे 30 वाहने सहभागी झाली होती.

    Aditya Thackeray drives electric car to reduce pollution, gets good response from all cities

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य