प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या आदल्या दिवशी पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी भाजपने बहिष्कार घातला ही सुद्धा एक प्रकारे “परंपरा” पाळली गेली. कारण कोणत्याही सरकारच्या अधिवेशन काळात अधिवेशनाच्या आदल्या दिवशी कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी विरोधक चहापानावर बहिष्कार घालत असतात. त्याप्रमाणे भाजपने आज बहिष्कार घातला.Aditya Thackeray attraction in the tea party program
पण त्याच वेळी या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणास्तव अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे चहापान कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बिंदू राहिले. प्रामुख्याने शिवसेना आमदारांनी त्यांच्याबरोबर फोटोसेशन करून घेतले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार वरिष्ठ मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते हे देखील आदित्य ठाकरे यांच्या समवेत बोलले. या वरिष्ठ नेत्यांचे देखील आदित्य ठाकरे यांच्या समवेत फोटोसेशन झाले.
एकीकडे आदित्य ठाकरे हे चहापान कार्यक्रमाचा आकर्षणबिंदू बनलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते. परंतु, चहापानाच्या कार्यक्रमास तब्येतीच्या कारणास्तव उपस्थित नव्हते.
या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी टीकेचा सूर काढला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या तब्येतीची काळजी जरूर घ्यावी. त्यांना आम्ही आरोग्य चिंतितो. पण त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राज्य चालवण्याच्या बाबतीत हयगय करू नये. त्यांनी विश्वासातली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे कारभार सोपवावा, अशी सूचना केली. यासाठी चंद्रकांत दादांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यासंदर्भातल्या फाईलचा उल्लेख केला. या फाईलवर नेमकी सही कोणी करायची याचा पाच तास निर्णय झाला नव्हता, याची आठवण चंद्रकांत दादा यांनी करून दिल्याची बातमी आहे.
अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या हातातला कारभार इतर कोणा विश्वास व्यक्तीकडे सोपवणे ही फक्त त्यांच्या हातातली राजकीय बाब राहिली आहे का?, की त्यांच्यावरच्या रिमोट कंट्रोलच्या हातात ही बाब आहे?, याविषयी राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
Aditya Thackeray attraction in the tea party program
महत्त्वाच्या बातम्या
- Election : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर
- पंजाबमध्ये विरोधकांचा भाजपमध्ये जंबो प्रवेश; वीस माजी मंत्री, खासदारासह आमदारांचा प्रवेश
- पुणे : महापालिकेच्या तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; वेतनाची बिले तयार करण्यासाठी २० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त
- IMPORTANT NEWS : म्हाडाची ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारीत होणार ;वाचा सविस्तर