प्रतिनिधी
मुंबई : सिनेमा आणि राजकारण एकाच नाण्याच्या दोन बाजू. राजकारणाचा सिनेमावर आणि सिनेमाचा राजकारणावर कसा आणि किती प्रभाव पडतो, याचे एक उदाहरण “आदिपुरुष” सिनेमाच्या निमित्ताने समोर आले आहे. भारतात सध्या “आदिपुरुष” सिनेमावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात “गद्दार” हा शब्द ट्रेंडमध्ये आहे. याचाच वापर करत भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना “गद्दारीचे आदिपुरुष” असे संबोधले आहे. Adipurush : Political Impact of Cinema; Sharad Pawar is the ancestor of traitors
शिवसेनेचा 19 जून रोजी वर्धापन दिन झाला. 2023 मध्ये मूळातच दोन शिवसेना झाल्याने दोन वर्धापन दिन साजरे झाले आणि दोन्ही शिवसेनांचे नेते एकमेकांना “गद्दार” म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनीही या गद्दारवादात उडी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे गटाबरोबर गद्दार दिवस साजरा केला. यावरून शिंदे गट आणि भाजपचे नेते चिडले आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा गद्दारीचा इतिहास काढला.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी 18 जुलै हा खरा गद्दार दिवस असे सांगून 18 जुलै 1978 ला रक्ताळलेला काकांचा खंजीर सध्या उद्धव ठाकरेंची पाठ शोधतोय, अशा शब्दात शरद पवारांच्या वसंतदादा पाटील एपिसोडची आठवण करून दिली, त्यापुढे जाऊन भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शरद पवारांना “गद्दारीचे आदिपुरुष” असे संबोधले. वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले. ते तर “गद्दारीचे आदिपुरुष” आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दार दिवस साजरा करण्याऐवजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा करून त्या दिवशी केक कापावा, असा टोला अनिल बोंडे यांनी लगावला. यातून “आदिपुरुष” सिनेमाचा राजकीय प्रभाव महाराष्ट्रात दिसला.
Adipurush : Political Impact of Cinema; Sharad Pawar is the ancestor of traitors
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले; भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत
- नव्या शैक्षणिक धोरणानुसार निर्माण होत असलेल्या पाठ्यपुस्तकांबाबत धर्मेंद्र प्रधान यांची विशेष माहिती
- ‘’…हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरे बावचळल्यासारखे बोलताय’’ फडणवीसांनी लगावला टोला!
- 18 जुलै हाच खरा गद्दार दिन!!; आमदार संजय शिरसाट असे का म्हणाले??