प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दुपारनंतर जो ट्विस्ट आला त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदावरून कळस गाठला. आधी जाहीर केल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नव्हते. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत देखील जाहीर केले होते. Adherence to the party as an honest worker; Deputy Chief Minister Devendra Fadnavis’s tweet
परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना आग्रह केला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील फडणवीसांना आग्रह केला. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. राजभवनातील शपथविधी कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
ही शपथ घेतल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडल करून ट्वीट करून आपण पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याने पक्षाच्या आदेशाचे पालन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
– फडणवीसांकडे खाती कोणती??
आजच्या राजकीय ट्विस्ट मधून अनेक बाबी महाराष्ट्रासमोर हळूहळू उलगडत आहेत. एकनाथ शिंदे त्यांचा शिवसेना हा पक्ष स्वतंत्र गट म्हणून बसणार की भाजपमध्ये विलीन होणार हा इथून पुढच्या काळातला कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा भाजप मधला एक मोठा हेवीवेट नेता उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे नेमकी नेमकी कोणती मंत्रिपदे दिली जाणार याविषयी देखील चर्चा आहे. महाविकास आघाडी मंत्रिमंडळात अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाचा बरोबर अर्थमंत्री पदाचा कार्यभार होता.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदा बरोबर अर्थमंत्री पदाचा कार्यभार येणार की ते मुख्यमंत्री असताना गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत होते, तसा गृहमंत्री पदाचा कार्यभार देवेंद्र फडणवीस स्वीकारणार की उपमुख्यमंत्री पदावर बरोबरच अर्थमंत्री आणि गृहमंत्री अशी दोन्ही पदे त्यांच्याकडे येणार, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Adherence to the party as an honest worker; Deputy Chief Minister Devendra Fadnavis’s tweet
- महत्वाच्या बातम्या
- नगरसेवक ते मुख्यमंत्री : ठाण्यातून सुरू झाली, मंत्रालयात सहाव्या मजल्यावर पोहोचली; एकनाथ शिंदेंची २५ वर्षांची कारकीर्द!!
- मास्टर स्ट्रोक : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले, पण पवारांच्या सूचनेनुसार नव्हे, तर फडणवीसांच्या पाठिंब्याने!!
- Corona In India : देशात पुन्हा कोरोना बेलगाम, 24 तासांत 29.7 टक्क्यांनी वाढले रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या एक लाखाच्या पुढे
- फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक : आपणच इतरांना मुख्यमंत्री बनवतो ही बाकीच्यांची घमेंड तोडली!!; वाघाची गाडी सत्तेला जोडली!!