वृत्तसंस्था
मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी सिमेंट कंपनी अंबुजा आणि एसीसीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करण अदानी सिमेंट व्यवसायाची जबाबदारी सांभाळणार आहे. अदानी समूहाने अंबुजा आणि ACC सिमेंटचे हे टेकओव्हर 6.5 अब्ज डॉलर म्हणजेच 51.79 हजार कोटींमध्ये केले आहे.Adani completes acquisition of Ambuja and ACC cement business handed over to elder son Karan The takeover was done for 6.5 billion dollars
ACC चे नॉन एक्झिक्यूटिव्ह चेअरमन झाले करण अदानी
या टेकओव्हरसह, अदानी समूह देशातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अल्ट्राटेक सिमेंट, सिमेंट उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी अंबुजा सिमेंटचे चेअरमन बनले आहेत. तर करण अदानी यांना नॉन एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
याशिवाय करण यांची ACC चे चेअरमन आणि नॉन एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. करण सध्या अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) चे सीईओ आहेत. अदानी समूहाचा हा करार भारतातील पायाभूत आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठे अधिग्रहण आहे.
ACC-Ambuja ही कंपनी होलसिम कंपनीच्या मालकीची होती
ACC म्हणजेच असोसिएटेड सिमेंट कंपन्या आणि अंबुजा या होलसिम कंपनीच्या मालकीच्या होत्या. ही स्वित्झर्लंडस्थित बांधकाम साहित्य कंपनी आहे. ACC ची सुरुवात 1 ऑगस्ट 1936 रोजी मुंबईतून झाली. अनेक गटांनी मिळून त्याचा पाया घातला होता. अंबुजा सिमेंटची स्थापना 1983 मध्ये नरोत्तम सेखसरिया आणि सुरेश नेओतिया यांनी केली होती.
17 वर्षांचा व्यवसाय गुंडळणार होलसिम
होलसिम कंपनीने 17 वर्षांपूर्वी भारतात व्यवसाय सुरू केला होता. ही जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी मानली जात होती. या करारानंतर आता कंपनी भारतातून आपला व्यवसाय गुंडाळणार आहे. होलसिम ग्रुपची देशातील दोन सिमेंट कंपन्यांमध्ये अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या कंपन्यांची हिस्सेदारी होती.
होलसिमचा अंबुजा सिमेंट्समध्ये होल्डरइंड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या माध्यमातून 63.19% आणि ACC मध्ये 54.53% हिस्सा होता (त्यापैकी 50.05% हिस्सा अंबुजा सिमेंट्सच्या माध्यमातून होता). अदानी समूहाने होलसिमचा अंबुजा सिमेंट आणि एसीसीमधील संपूर्ण हिस्सा विकत घेतला आहे.
Adani completes acquisition of Ambuja and ACC cement business handed over to elder son Karan The takeover was done for 6.5 billion dollars
महत्वाच्या बातम्या
- ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी : 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांत 608 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
- चंदीगड विद्यापीठातील धक्कादायक प्रकार : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल; 8 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
- पुढच्या मराठवाडा मुक्तिदिनापूर्वी दौलताबाद किल्ल्याचे नाव ‘देवगिरी’ करणार , पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा
- नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी अर्थात राष्ट्रीय रसद नीती जाहीर!; तिचे महत्त्व काय?