• Download App
    अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे संपूर्ण कुटुंबच आहे सेलीब्रिटी, दहा वर्षांच्या मुलीने १७ जणांचे प्राण वाचविल्याने मिळाला होता राष्ट्रीय शौर्य पुरस्कार|Ad. Gunaratna Sadavarte's entire family is a celebrity, a 10-year-old girl saved 17 lives

    अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे संपूर्ण कुटुंबच आहे सेलीब्रिटी, दहा वर्षांच्या मुलीने १७ जणांचे प्राण वाचविल्याने मिळाला होता राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : एसटी आंदोलनातील कर्मचाऱ्यांचे वकील म्हणून चर्चेत आलेले आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी अटक झालेले अ‍ॅड. गुणररत्न सदावर्ते यांचे संपूर्ण कुटूंबच सेलीब्रिटी आहे. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली होत. त्यांना झेन नावाची चौदा वर्षांची मुलगी आहे. तिने दहा वर्षांची असताना १७ जणांचे प्राण वाचविले होते. यासाठी २०१८ मध्ये झेनला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला होता.Ad. Gunaratna Sadavarte’s entire family is a celebrity, a 10-year-old girl saved 17 lives

    सदावर्ते हे मुंबईतील परळ येथे क्रिस्टल प्लाझा या इमारतीत राहतात. २२ ऑगस्ट २०१८ रोजी परळच्या ‘क्रिस्टल प्लाझा’ या इमारतीला आग लागली होती. त्यावेळी तिसरीत शिकणाºया १० वर्षांच्या झेनने प्रसंगावधान दाखवत इमारतीतील अनेकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. आगीमुळे सर्वत्र व खोल्यांमध्ये धूर झालेला होता.



    तेथे थांबलेल्या १७ जणांना तिने टॉवेल ओले करून त्याचा विशिष्ट पद्धतीने मास्कप्रमाणे वापर करून श्वासोच्छवास करण्यास सांगितले. त्या सर्वांनी झेनचा सल्ला मानला आणि धूर असूनही ते सर्व गुदमरून गेले नाहीत. त्यामुळे १७ लोकांचे प्राण वाचले होते. याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते झेन सदावतेर्ला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    गुणरत्न सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचे वडील भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाकडून नांदेड महापालिकेवर निवडून गेले होते. स्वत: गुणरत्न सदार्वे यांनी आत्तापर्यंत अनेक खटले लढले आहेत. मात्र, मराठा आरक्षणाविरुध्द लढलेल्या खटल्यामुळे ते चर्चेत आले. महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवगातंर्गत आरक्षण दिले होते. मात्र मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालया दाखल केली. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले.

    गुणरत्न सदावर्ते यांचा डॉ. जयश्री पाटील यांच्याशी विवाह झाला आहे. जयश्री पाटील यांचा जन्म माहूरगड या गावचा. त्यांचं शालेय शिक्षण तिथेच झालं. पुढे त्यांनी वकिलीचं शिक्षण औरंगाबादमध्ये घेतलं तर एलएलएम मुंबईत केलं. त्यांनी क्रिमिनॉलॉजी या विषयात पीएचडी केली आहे. त्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत.

    त्यांनी या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. राज्य मानवी हक्क आयोग मुंबई इथे राज्य संशोधन अधिकारी म्हणून कामही केलेलं आहे. 2018 साली मराठा आरक्षणाचे बिल मंजूर झालं तेव्हा त्यांनी राज्यपालांकडे हरकत याचिका दाखल केली होती.माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातही त्यांनी याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती

    Ad. Gunaratna Sadavarte’s entire family is a celebrity, a 10-year-old girl saved 17 lives

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!