• Download App
    अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासह घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन । Actress Shilpa Shetty along with her husband Raj Kundra visited Saptashrungi Devi

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासह घेतले सप्तशृंगी देवीचे दर्शन

    सुरुवातीला मास्क घातलेले असल्यामुळे शिल्पा शेट्टी ओळखून आल्या नाहीत.मात्र, मास्क काढल्यावर सर्वत्र शिल्पा शेट्टी गडावर आल्याची माहिती मिळाली. Actress Shilpa Shetty along with her husband Raj Kundra visited Saptashrungi Devi


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व पती राज कुंद्रा यांनी मंगळवारी (दि. ४) रोजी दुपारी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. शिल्पा आणि राज कुंद्रा सप्तशृंगीचरणी दर्शनासाठी आले.यावेळी ग्रामपंचायत व सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टकडून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.



    सुरुवातीला मास्क घातलेले असल्यामुळे शिल्पा शेट्टी ओळखून आल्या नाहीत.मात्र, मास्क काढल्यावर सर्वत्र शिल्पा शेट्टी गडावर आल्याची माहिती मिळाली. ही माहिती चाहत्यांना समजताच या परिसरात गर्दी झाली.यानंतर पोलिसांना ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

    याआधी पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी राज कुंद्रा गेल्या वर्षी अडचणीत आला होता.त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.यानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना हिमाचल प्रदेशात स्पॉट करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील शत्रुनाशिनी माँ बगलामुखी मंदिर बनखंडी येथे त्यांनी एकत्र पूजा केली. शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत चामुंडा देवी मंदिर आणि ज्वालामुखी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.

    Actress Shilpa Shetty along with her husband Raj Kundra visited Saptashrungi Devi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ