गेल्या आठवड्याभरापासून दीपिकाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर नुकतेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला देखील कोरोनाची लागन झाली आहे.
दीपिका आपल्या परिवारासह बेंगलुरूमध्ये आहे
दीपिकाची आई आणि बहीणही कोविड पॉझिटिव्ह आहेत Actress Deepika Padukone infected with corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई: देशात कोरोनाने सध्या थैमान घातलं आहे. अनेकांना कोरोनाने विळखा घातला आहे .यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचाही समावेश आहे. तर आता नुकतंच अभिनेत्री दीपिका पुदकोणला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांनाही कोरोनाची लागण झाली त्यानंतर दिपीका देखील पॉसिटीव्ह असल्याचे समजले आहे.
दीपिकाच्या वडिलांच्या कोरोना चाचणीचा अहवाल गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता दीपिकाचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर आता दीपिकालाही कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिपीकाचे वडील प्रकाश पदुकोण तसंच आई उज्ज्वला आणि बहीण अनिषाला कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली होती. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता दीपिकाही कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तिचं पूर्ण कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे.
Actress Deepika Padukone infected with corona
महत्त्वाच्या बातम्या
- Maratha Reservation Result 2021 : एक मराठा लाख मराठा ; आज ऐतिहासिक बुधवार ; फडणवीस सरकारने दिलेल्या आरक्षणात आतापर्यंत काय घडलं?
- सिरम इन्स्टिट्यूट ब्रिटनमध्ये करणार २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक, आदर पूनावाला यांची घोषणा
- देवदूत बनलेत पाच तरुण, मोटारीची अॅम्ब्युलन्स करून गरजूंना पुरवत आहेत ऑक्सिजन
- आंध्र प्रदेशात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन, पंधरा पट धोकादायक, मृत्यूंचे प्रमाण वाढणार
- कोरोनामुळे माता-पित्यांना गमावलेल्या अनाथांसाठी स्मृति इराणींची मोहीम, पोलीसांना माहिती देण्याचे कळकळीचे आवाहन