Actor Sonu Sood : कोरोना काळात गरीब आणि मजुरांना मदत करून जगभरात प्रसिद्ध झालेला अभिनेता सोनू सूद वादात अडकलेला दिसत आहे. प्राप्तिकर विभागाने मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्रामसह 28 ठिकाणी छापे टाकून 3 दिवसांनी सोनू सूदने 20 कोटींची करचुकवेगिरी केल्याचा दावा केला आहे. या छाप्यानंतर अभिनेता किंवा त्याच्या पीआर टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. Actor Sonu Sood, associates evaded ₹20 crore in tax, says income tax dept
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना काळात गरीब आणि मजुरांना मदत करून जगभरात प्रसिद्ध झालेला अभिनेता सोनू सूद वादात अडकलेला दिसत आहे. प्राप्तिकर विभागाने मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्रामसह 28 ठिकाणी छापे टाकून 3 दिवसांनी सोनू सूदने 20 कोटींची करचुकवेगिरी केल्याचा दावा केला आहे. या छाप्यानंतर अभिनेता किंवा त्याच्या पीआर टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
प्राप्तिकर विभागानुसार “तपासात सोनू सूदने परदेशी देणगीदारांकडून 21 कोटींचा नॉन-प्रॉफिट निधी गोळा केला, जो अशा प्रकारच्या व्यवहारांना नियंत्रित करणाऱ्या कायद्याचे उल्लंघन आहे.
लखनऊमधील एका कंपनीचे 11 लॉकर्स
प्राप्तिकर विभागाने त्याच्या चॅरिटी ट्रस्टवर परदेशी योगदान कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. प्राप्तिकर विभागाच्या या खुलाशानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) येत्या काळात हे प्रकरण दाखल करू शकते.
प्राप्तिकर विभागाने लखनऊमधील एका इन्फ्रा कंपनीवर छापा टाकल्याचे सांगितले आहे. मुंबईतील अभिनेत्याची या कंपनीत भागीदारी आहे आणि या कंपनीने मोठ्या प्रमाणावर प्राप्तिकर टाळला आहे. कंपनीच्या दिल्ली, जयपूर, लखनऊ आणि गुरुग्राम येथील ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि छाप्यांदरम्यान 1 कोटी 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 11 लॉकर्सदेखील आढळले आहेत. या कंपनीच्या 175 कोटी रुपयांच्या व्यवहारावर प्राप्तिकर विभागालाही संशय आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Actor Sonu Sood, associates evaded ₹20 crore in tax, says income tax dept
महत्त्वाच्या बातम्या
- Amarinder Singh Profile : सैन्याचा राजीनामा दिलेला असून युद्धावर गेले होते कॅप्टन, अशी आहे अमरिंदर सिंग यांची राजकीय कारकीर्द
- थरूर यांचे बिनधास्त बोल : म्हणाले- काँग्रेसला स्थायी अध्यक्षांची गरज, राहुल गांधी तयार नसतील तर पर्याय शोधावा लागेल!
- पंजाबमध्ये काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? विधिमंडळ गटाचा नेता सोनिया गांधी निवडणार, सिद्धूंशिवाय हे 4 नेतेही शर्यतीत
- Punjab CM Captain Amarinder Singh Resign : पंजाबात कॅप्टन अमरिंदर यांची विकेट, राजीनाम्यानंतर म्हणाले, “खूप अपमानित वाटले, हायकमांडला ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना सीएम करावे!”
- खुशखबर : खाद्य तेलांच्या किमतीत घसरण, जाणून घ्या कोणते तेल किती झाले स्वस्त?