• Download App
    ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास, मुंबईतील रुग्णालयात दाखल । Actor dilip kumar is admitted to hinduja hospital in khar he complained of breathlessness

    ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास, मुंबईतील रुग्णालयात दाखल

    Actor Dilip Kumar : प्रसिद्ध हिंदी सिनेमा अभिनेता दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रुग्णालयात दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. Actor dilip kumar is admitted to hinduja hospital in khar he complained of breathlessness


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : प्रसिद्ध हिंदी सिनेमा अभिनेता दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रुग्णालयात दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    गेल्या महिन्यातही दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल केले असल्याचे सांगितले होते. दिलीप कुमार यांच्या आरोग्याच्या कारणास्तव त्यांची नियमित तपासणी वेळोवेळी होत असते. सर्व अहवाल ठीक आल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले होते.

    दरम्यान, दिलीपकुमार हे 98 वर्षांचे आहेत. कोरोनामुळे त्यांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. कोरोनामुळे दिलीप कुमार यांनी आपला वाढदिवसदेखील साजरा केला नाही. सन २०२० मध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे दिलीप कुमार यांचे दोन भाऊ 88 वर्षीय असलम खान आणि 90 वर्षीय एहसान खान यांना गमवावे लागले होते. दिलीप कुमार मार्च 2020 पासून पत्नी सायरा बानोसह विलगीकरणात आहेत.

    दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव युसूफ खान आहे. तथापि, चित्रपटाच्या जगात प्रवेश केल्यावर त्यांनी आपले नाव बदलून दिलीप कुमार ठेवले. या नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर तो मुघल-ए-आझम, नया दौर, कोहिनूर, ‘राम और श्याम’मध्येही त्यांनी लोकप्रिय भूमिका साकारल्या. ‘किला’ हा त्यांचा पडद्यावरील अखेरचा चित्रपट होता.

    Actor dilip kumar is admitted to hinduja hospital in khar he complained of breathlessness

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य