• Download App
    अभिनयातला बॅरिस्टर काळाच्या पडद्याआड; विक्रम गोखलेंनी घेतला अखेरचा श्वास actor  barrister Kalechaya Paddiyaad; Vikram Gokhaleni breathed his last

    अभिनयातला बॅरिस्टर काळाच्या पडद्याआड; विक्रम गोखलेंनी घेतला अखेरचा श्वास

    प्रतिनिधी

    पुणे : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे बॅरिस्टर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र या सुरू असलेल्या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली ते 78 वर्षांचे होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून आज, शनिवारी सायंकाळी 6.00 वाजता वैंकुठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. actor  barrister Kalechaya Paddiyaad; Vikram Gokhaleni breathed his last

    दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले हे कायम चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रूपेरी पडदा अशा तिनही माध्यमांत काम केले आहे. त्यांनी रंगभूमीवर एक मोठा काळ गाजवला.

    मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही अनोख्या अभिनय शैलीने विक्रम गोखलेंचा दबदबा कायम होता. मराठी मालिका विश्वातील अग्निहोत्र या मालिकेत त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी घशाच्या त्रासामुळे नाटकापासून ब्रेक घेतला होता. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

    actor  barrister Kalechaya Paddiyaad; Vikram Gokhaleni breathed his last

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस