दरम्यान मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना त्याबदल्यात दंडाची पावती आणि मास्क दिला जातो. या कारवाईमधून मास्क वापरण्याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती देखील केली जात आहे.Action taken against 2,700 people at Pune railway station for not wearing masks
विशेष प्रतिनिधी
पुणे : रेल्वे स्थानकांवर मास्क वापरत नसलेल्या प्रवाशांकडून दंड घेण्यात येत आहे.दरम्यान मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांना त्याबदल्यात दंडाची पावती आणि मास्क दिला जातो. या कारवाईमधून मास्क वापरण्याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती देखील केली जात आहे.दरम्यान मास्क न वापरणा-यांकडून प्रत्येकी २०० ते २५० रुपये दंड वसूल केला जात आहे.
एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत पुणे रेल्वे विभागात २,७२९ प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली असून सहा लाख ४८ हजार ६५० रुपये दंड आकारण्यात आला आहे.दरम्यान डिसेंबर महिन्यात पुणे रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकांवर मास्क न वापरणा-या १०२ नागरिकांवर कारवाई केली आहे.तसेच या नागरिकांकडून हजारो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच रेल्वे विभागाकडून कोरोना महामारीला संपवण्यासाठी नागरिकांनी रेल्वे स्थानक ,परिसरात व रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे आवश्यक आहे.तसेच रेल्वेमध्ये थुंकून घाण करू नये. कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Action taken against 2,700 people at Pune railway station for not wearing masks
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- BOLLYWOOD : कपूर कुटुंबात कोरोना ! अर्जुन कपूरसह अनिल कपूरच्या मुलीला करोनाची लागण…
- सतर्कतेचा इशारा : राधानगरी धरणातून तांत्रिक अडचणीमुळे पाण्याचा विसर्ग वाढला! पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- जगन्नाथ पुरी मंदिर परिसरात जागतिक दर्जाचा हेरिटेज कॉरिडॉर; नवीन पटनायक यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ सुरु