• Download App
    शिलाटणे गावाजवळ अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू । Accident near Shilatne village; Five people died on the spot A Ford car crashed into a cantner on the old Mumbai highway

    शिलाटणे गावाजवळ अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू

    • जुन्या मुंबई हायवेवर फोर्ड कार कंटनेरवर आदळली

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. Accident near Shilatne village; Five people died on the spot A Ford car crashed into a cantner on the old Mumbai highway



    मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळली. अति वेगात असणाऱ्या चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्ये असणारे दुभाजक ओलांडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरखाली कार घुसली. यामुळे कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील सर्वच म्हणजेच पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

    अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ तसेच पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली कार आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले.

    Accident near Shilatne village; Five people died on the spot A Ford car crashed into a cantner on the old Mumbai highway

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा