• Download App
    अबुझर पटेल, वालीद खान, शहाबाज पटेल यांची औरंगाबादेत व्हॅलेंटाईन पार्टी; मुलींना फ्री एन्ट्री!!। Abuzar Patel, Walid Khan, Shahbaz Patel's Valentine Party in Aurangabad; Free entry for girls !!

    अबुझर पटेल, वालीद खान, शहाबाज पटेल यांची औरंगाबादेत व्हॅलेंटाईन पार्टी; मुलींना फ्री एन्ट्री!!

    प्रतिनिधी

    औरंगाबाद : एकीकडे इस्लामचा हवाला देत मुस्लिम मुलींसाठी बुरखा परिधान करण्याचा आग्रह धरायचा आणि हिंदू मुलींसाठी valentine night आयोजित करायची!! हा औरंगाबाद मधील काही युवकांचा डाव दिसून येत आहे. Abuzar Patel, Walid Khan, Shahbaz Patel’s Valentine Party in Aurangabad; Free entry for girls !!

    औरंगाबाद (संभाजीनगर) शहरात  १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे निमीत्त बीड बायपास रोडवरील हॅाटेल कार्नीवल येथे आयोजक अबुझर पटेल, वालीद खान, शाइबाझ पटेल यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्या कार्यक्रमाचे नाव ‘रिंग्स & ड्रिंक्स’ असून या कार्यक्रमात मुलींना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. ही पार्टी सायंकाळी 6.00 वाजता सुरू होणार आहे. तसा फलक लावण्यात आला आहे.

    मुस्लिम समाजातील महिलांनी हिजाब आणि बुरखा परिधान करायचा आणि याच मुस्लिम व्यक्तींनी व्हॅलेंटाईनची पार्टी आयोजित करायची आणि मुलींना प्रवेश फ्री ठेवायचा, हे म्हणजे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असे झाले. मुस्लिम व्यक्तींकडून अशी पार्टी आयोजित होणं म्हणजे यात हिंदू वा इतर धर्माच्या मुलींना फसवण्यासारखं आहे, अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

    गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे देशभरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरूनच राजकीय वर्तुळातदेखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले. चंद्रपूरमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या मोहिमा राबवण्यात आल्या, गुरुवारी पुण्यात हिजाबच्या समर्थनार्थ, तसेच विरोधातही मोर्चे काढण्यात आले. रविवारी मुंब्रा येथे मुस्लिम महिलांनी हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन केले.

    या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत व्हॅलेंटाईन पार्टी आयोजित करून मुलींना फ्री एन्ट्री ठेवण्याचा आयोजकांचा दिसून येत आहे.

    Abuzar Patel, Walid Khan, Shahbaz Patel’s Valentine Party in Aurangabad; Free entry for girls !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ