• Download App
    औरंगाबादचे समर्थन करताना अबू आझमींचे बिघडले बोल; म्हणाले, महाराष्ट्राचेच नामांतर संभाजी करा, रायगडाचे नाव पण बदला!! Abu azmi supports aurangabad, but angrily said change the names of maharashtra and raighad itself

    औरंगाबादचे समर्थन करताना अबू आझमींचे बिघडले बोल; म्हणाले, महाराष्ट्राचेच नामांतर संभाजी करा, रायगडाचे नाव पण बदला!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव, असे करण्याचे पाऊल उचलले असताना समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू असीम आझमी यांचे पित्त खवळले आहे. औरंगाबाद नावाचे समर्थन करताना त्यांचे बोल आणखीनच बिघडले आहेत. Abu azmi supports aurangabad, but angrily said change the names of maharashtra and raighad itself

    छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे कार्य फार मोठे आहे. त्यामुळे एका छोट्या शहराचे नामांतर करून संभाजीनगर करण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राचेच नामांतर करून ते संभाजी करावे. आणि रायगड या नावाला पण अर्थ काही नाही त्यामुळे रायगडाचेही नामांतर करावे, असे अजब वक्तव्य अबू असीम आझमी यांनी केले आहे.



    महाराष्ट्रात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या तीनच शहरांना मुस्लिम नावे आहेत. केवळ व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी या जुन्या शहरांची नामांतरे होत आहेत, असा आरोप करून त्यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर या नावांचेच समर्थन केले.

    अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी सकाळी आली होती. धमकी देणाऱ्या अज्ञाता विरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. परंतु त्यानंतर अबू आझमी यांचे बोल आणखीनच बिघडल्याचे दिसत आहे.

    Abu azmi supports aurangabad, but angrily said change the names of maharashtra and raighad itself

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल